माना दास कॅश काऊ फिन्सर्व्ह प्रा.लि.यांचे मार्फत कोळंब शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- माना दास कॅश काऊ फिन्सर्व्ह प्रा. लि. यांचे मार्फत राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोळंब या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या वि द्यार्थ्यांना मोफत दप्तर,वह्यां आणि कंपास पेटी या शैक्षणि क साहित्याचे वाटप नुकतेच कोळंब येथे करण्यात आले.
  • कोळंब ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष धोंडू बुवा पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माना दास कॅशकाऊ फिन्स र्व्हचे संस्थापक मानाजी धावले, आत्माराम धावले, महेश सोनकर, गोरखनाथ पवार, महेश पवार तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थि तीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रसाद काकिर्डे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक जयेश तेलंग यांनी केले.
  • संस्थापक मानाजी धावले यांनी आपल्या मनोगतात शिक्ष णाशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी कठोर परिश्रम करा, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपल्या मिळकतीचा काही भाग शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात गेली अनेक वर्षे माना दास कॅशकाऊ फिन्सर्व्ह प्रा.लि.देऊ करत आहे. या बद्दल कोळंबवाशीयांनी संस्थेचे कौतुक केले.
  • यावेळी उपाध्यक्षा सुप्रिया पाटेकर,सुनिता कांबळे,स्वप्नाली पाटेकर, समीक्षा पाटेकर, संचिता पाटेकर,आसावरी माने, वैदेही पाटेकर,नीता तोरसकर, सपना कांबळे, मनिषा पाटे कर, पाडिलकर तसेच शिक्षक विजयकुमार माने, प्रणाली मोरे व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
  • कोळंबचे ग्रामस्थ व पालकवर्गातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles