नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पोलिस दलातील चालक-शिपाई पदासाठी ५०० उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण,पात्र उमेदवारांना वाहन कौशल्य चाचणीला १०जाने.ला बोलविणार – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पोलिस दलातील चालक-शिपाई पदासाठी ५०० उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण,पात्र उमेदवारांना वाहन कौशल्य चाचणीला १०जाने.ला बोलविणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: सचिन ना. कोयरे : पोलिस दलात चालक शिपाई पदासाठी २ जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.नवीन पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, या पदाच्या १४ जागांसाठी तब्बल १ हजार ७८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.                      २ जानेवारी रोजी २०० उमेदवारांना प्रवेशपत्रे देऊन मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १४४ उमेदवार हजर राहिले, तर ५६उमेदवार गैरहजर राहिले. हजर राहिलेल्यांपैकी ३४ उमेदवार अपात्र ठरले.पहिल्या दिवशी ११० उमेदवार शारीरिक चाचणीस पात्र ठरले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ जानेवारी रोजी ३०० उमेदवारांना प्रवेशपत्रे देऊन मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी २१४ उमेदवार हजर राहिले, तर ८६ उमेदवार गैरहजर राहिले. दुसऱ्या दिवशी १६९ उमेदवार पात्र ठरले, तर ४५ उमेदवार अपात्र ठरले.  उर्वरित भरती प्रक्रिया ७ व ८ जानेवारी रोजी पार पडणार आहे. ७ जानेवारीला ३०० उमेदवार,तर ८ जानेवारीला २७८ उमेदवारांची भरती प्रक्रिया पडेल. सदर भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना १० जानेवारी रोजी वाहन कौशल्य चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे.                                                                                                              सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा