नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुणबी समाजोन्नती संघाच्या गुहागर तालुका मुंबई शाखा अध्यक्षपदी कॄष्णा वणे तर सरचिटणीसपदी अनंत मालप यांची निवड. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

कुणबी समाजोन्नती संघाच्या गुहागर तालुका मुंबई शाखा अध्यक्षपदी कॄष्णा वणे तर सरचिटणीसपदी अनंत मालप यांची निवड.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : प्रमोद तरळ :- मुंबई कुणबी समाजो न्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहा गर (मुंबई) यांच्या कार्यकारिणी निवडीची सभा‌ शुक्रवार दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी सायं ६.३० वा. गुहागर तालुका पतपेढी कार्यालय, प्रभादेवी (प) मुंबई येथे माजी संघाध्यक्ष राम शिगवण यांच्या मार्गदर्शना खाली तसेच जी.बी. पाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
  • या सभेला ग्रामीण रचने प्रमाणे तवसाळ,पालशेत, हेदवी व गुहागर असे चार गट असून या सभेला चारही गटांचे पदाधिकारी उपस्थित होते.
  • सदर सभेत शाखेच्या पंचवार्षिक कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून शाखेच्या अध्यक्षपदी कॄष्णा वणे तर सरचिटणीसपदी अनंत मालप यांची पुन्हा एकदा एकमताने निवड करण्यात आली.
  • सदर कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी रघुनाथ घुमे (गुहागर गट), सुनिल रांगळे (पालशेत गट), बबन राव कांबळे (हेदवी गट), शांताराम पागडे (तवसाळ गट), सेक्रेटरी अनंत मालप, सहसेक्रेटरी शांताराम आग्रे, सुनिल कुळे, वसंत कावणकर, रामदास गोन बरे, खजिनदार शांताराम रत्नू ठोंबरे, कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तेलगडे,भरत सोनू भुवड, लक्ष्मण भेकरे,संदीप ठोंबरे, महादेव पाष्टे, सुधाकर झिंबर यांची तर संघ प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून रामचंद्र ग. शिगवण, गंगाराम पाष्टे, कॄष्णा वणे, अनंत साटले,माधव कांबळे, रामचंद्र तेलगडे, बबन कांबळे, गिरीश बारस्कर, अनंत मालप आदींची निवड झाली आहे नवनियुक्त पदाधिकारी, कार्यका रिणी सदस्य व संघ प्रतिनिधी यांच्यावर अभिनंदना चा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा