
शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गुहागर तालुक्यातील मासु,शीर,आबलोली, सडे जांभारी, पाचेरी येथील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप.
- प्रतिनिधी : गुहागर : प्रमोद तरळ :- दि.१६ जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर मुले शाळेत येतात.

- याच पहिल्या दिवशी समाजसेवक राजेश मासवकर यां च्या शांताराम चॅरीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून गुहागर तालु क्यातील आदर्श प्राथमिक शाळा मासु शाळा क्रं.१,आदर्श प्राथमिक शाळा शीर शाळा क्रं.१,आदर्श प्राथ मिक शाळा आबलोली शाळा क्रं.१,आदर्श प्राथमिक शाळा सडे जांभा री शाळा क्रं.१, आदर्श प्राथमिक शाळा पाचेरी सडा शाळा क्रं.१, या शाळेतील एकूण २०० विद्यार्थ्यांना रेनकोट, इतर शैक्षणिक साहित्य तसेच शाळेसाठी स्टेशनरी भेट देण्यात आले.

- याशिवाय प्रत्येक शाळेतील शिक्षकवृंदाला छत्री आणि पे न प्रेमपूर्वक भेट दिली.

- शांताराम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाजसेवक राजेश मासवकर करत असलेल्या कार्याचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











