शिक्षकांचे शिक्षकदिनी काळ्या फीत आंदोलन.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : हर्षल ठाकरे :- राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. ५) शिक्षकदिनी काळी फीत आंदोलन छेडण्यात येणार आहे.
- असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी दिला.
- आज सहाय्यक शिक्षण संचालक एल. डी. सोनवणे यांना संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
- उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आंदोलना वेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उन्हाळी अधिवेशन संपल्यावर चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले होते.
- मात्र पावसाळी अधिवेशन संपून महिना झाला,तरी ही चर्चा केलेली नाही. त्यामुळे कनिष्ठ महाविद्या लयीन शिक्षकांमध्ये फसवणूक केल्याची भावना तयार झाली आहे, असे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
- १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अर्धवेळ, अंशतः अनुदानित तत्त्वा वरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवानिवृत्तांना या योजनेचा लाभ द्यावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे १०-२०-३० वर्षांची आ श्वासित प्रगती योजना लागू करावी आणि निवड श्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.
- संघटनेच्या इतर मागण्या
- संघटनेतर्फे आंदोलनानिमित्ताने १३ मागण्या केल्या आहेत. त्यातील काही मागण्या अशा : वाढीव पदांना रुजू दिवसापासून मंजुरी देऊन आय.टी. विषय अनुदानित करावा.
- अघोषित उच्च माध्यमिकला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानाच्या शाळा व कनिष्ठ महावि द्यालयांना प्रचलित अनुदान सूत्र लागू करावे.
- अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, विनाअनुदानित मधून अनुदा नितमध्ये बदलीला १ डिसेंबरपासून लागू केलेली स्थगिती रद्द करावी.
- शिक्षकांची सर्व रिक्तपदे भरण्यात यावीत. संघटने च्या निवेदनावर प्रा. शिंदे यांच्यासह सचिव प्रा. संतोष फाजगे, समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर यांची स्वाक्षरी आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space