नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील शिक्षक-कर्मचारी शिक्षक गौरव दिनावर टाकणार बहिष्कार. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील शिक्षक-कर्मचारी शिक्षक गौरव दिनावर टाकणार बहिष्कार.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : हर्षल ठाकरे :- आदिवासी विकास विभागातील राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक-कर्मचारी मंगळवारच्या (ता. ५) शिक्षक गौरव दिनावर बहिष्कार टाकणार आहेत. काळ्या फिती लावणार आहेत.
  • प्रलंबित मागण्यासाठी निषेधदिन पाळण्यात येणार आहे, असा इशारा सीटू संलग्न आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक-कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
  • सीटू संलग्न संघटनेतर्फे २३ ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर शाळेची वेळ बदलून पूर्वीप्रमाणे सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी करण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी लाक्षणिक आंदोलन केले.
  •  आदिवासी विकास प्रशासन आणि आदिवासी विकास मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी १५ दिवस निवेदन देऊनही कोणतीही चर्चा केली नाही.
  • आंदोलनावेळी मंत्र्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याने सकाळी पावणेनऊ ते सायंकाळी पाच ही वेळ विद्यार्थी, पालकांसह कर्मचाऱ्यांसाठी गैरसोयीची ठेवली.
  • त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
  • संघटनेतर्फे १६ मागण्या
  • संघटनेतर्फे आंदोलनानिमित्ताने १६ मागण्या केल्या आहेत. त्यातील काही मागण्या अशा : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
  • केंद्राप्रमाणे निवृ त्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे. शाळा आणि वसतिगृह विभाग वेगळा करण्याबाब त सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. नवीन आकृतिबंध रद्द करून रद्द झालेली पदे पुनर्रज्जीवत करावीत.
  • रोजंदारी वर्ग तीन व चार आणि कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे. बाह्य स्त्रोताद्वारे भरती प्रक्रिया कायमस्वरूपी रद्द करावी.
  • आदिवासी विकास विभागातील कार्यालयीन कर्म चाऱ्यांप्रमाणे १०-२०-३० वर्षाची त्रिस्तरीय वेतन श्रेणी शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गाला लागू करावी.
  • दहावी, बारावीचा निकाल ८० व ५० टक्क्यांपेक्षा कमी लागल्यास वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही रद्द करावी. शिक्षकांना विश्‍वासात घेऊन गुणवत्ता वाढीसाठी नियोजन करावे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा