नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नाशिक पोलिसांचे अंधारात चाचपडणे सुरूच; परराज्यातील कुख्यात टोळीबाबत शहरभर चर्चा. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

नाशिक पोलिसांचे अंधारात चाचपडणे सुरूच; परराज्यातील कुख्यात टोळीबाबत शहरभर चर्चा.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजाराम खांगड :- शहरातील नामां कित बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण नाट्याला चोवीत तासापेक्षा अधिक तास होऊनही पोलिसांच्या हाती अद्यापही काहीही लागलेले नाही.
  • तर, अपहरणकर्त्यांकडून सुटका झालेले हेमंत पारख यांनी दिलेल्या जबाबातूनही पोलिसांना नवीन काहीही माहिती मिळत नसल्याने पोलिसांचे अंधारात चाचपडणे सुरूच आहे.
  • दरम्यान, या अपहरण नाट्यामागे परराज्यातील कुख्यात टोळीचा सहभाग असल्याची चर्चा मात्र शहरभर वार्यासारखी पसरलेली आहे.
  • यावर मात्र अपहृत व पोलीस दोघांकडून चुप्पी साधली जात असल्याने संशयाचे ढग कायम आहेत.
  • बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे गेल्या शनिवारी (ता. २) रात्री साडेनऊ-दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या इंदिरानगरमधील राहत्या बंगल्या समोरून अज्ञातांनी अपहरण केले होते.
  • परंतु त्यांची अवघ्या तासांमध्ये वलसाड (गुजरात) येथे सुटकाही करण्यात आली. त्यामुळे ते रविवारी (ता. ३) सकाळी साडेअकरा-बारा वाजेच्या दरम्या न नाशिकमध्ये परत आले.
  • या सार्या घटनाक्रमात पारख यांनी जे सांगितले तेच, त्यांनी आज इंदिरा नगर पोलिसांना जबाब देताना सांगितले आहे.
  • त्यामुळे पोलीस अधिकार्यांना अपहरणकर्त्यांची ठोस अशी कोणतीही माहिती मिळत नसल्याने पोलिसांचा अंधारात चाचपडणे दुसर्या दिवशीही सुरूच आहे.
  • पारख सुखरुप परतले असले तरी त्यांचे अपहरण कोणी केले, कशासाठी केले यासह अपहरणकर्त्यां नी त्यांना साेडून का दिले यासह अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत.
  • या प्रश्नांची उकल करण्यासाठी शहर गुन्हशाखेचे पथके अजूनही शोध घेत आहेत.
  • पोलीस तांत्रिक विश्लेषणासाठी शहरातील सीसी टीव्ही, मोबाईल टॉवर लोकेशन, शहराबाहेर जाणा र्या प्रत्येक रस्त्यांवरील टोलनाक्यावरील फुटेज यासह पारख यांच्या आर्थिक व जमिनीच्या व्यवहा राशी संबंधितांकडे कसून चौकशी केली जात आहे. परंतु पोलिसांच्या हाती अद्यापही काही लागू शकलेेले नाही.
  • तेच ते म्हणणे
  • पारख यांच्याकडे राजकीय नेते, पदाधिकारी, नातलगांशी भेटीगाठी व बोलण्यासाठी पुरेसा वेळ आहे.
  • परंतु पोलिसांकडे सविस्तर जबाब नोंदविण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याचे समजते. इंदिरानगर पोलिसांं नी पारख यांना जबाबासाठी बोलावले असता ते आलेच नाही.
  • पोलिस त्यांच्याकडे गेले असता त्यांनी पहिल्या दिवशी जे सांगितले तेच पोलिसांना सांगितले.वरिष्ठ अधिकार्यांनी पारख यांची मानसिकता ठीक नस ल्याचे सांगत वेळ मारून नेली असली तरी कुठेतरी पाणी मुरते आहे, हे मात्र नक्की.
  • शहरभर एकच चर्चा
  • पारख यांचे परराज्यातील एका कुख्यात टोळीने अपहरण केल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. परंतु याबाबत ना अपहृत, ना पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.
  • मात्र, ज्या प्रकारे सदरचे अपहरणनाट्य घडले आहे त्यावरून या सार्या प्रकरणावर संशयाचे दाट धुके अद्यापही कायम आहे.
  • संशयिताच्या मागावर असलेले गुन्हेशाखेच्या पथ कांच्या हातीही काहीही लागू शकलेले नाही. मात्र यामुळे शहर पोलिसांच्या उणिवा प्रकर्षाने उघड झाल्याचीच चर्चा पोलीस वर्तुळातच होते आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा