नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राजर्षी शाहू करिअर अकॅडमी अध्यक्षावर अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप….! – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

राजर्षी शाहू करिअर अकॅडमी अध्यक्षावर अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप….!

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : संदीप कारके :- संशयित आरोपी संजय लोकरे याने एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला रात्रीच्या सुमारास पायाला मालिश करण्यासाठी आपल्या खोलीत बोलावून घेतले आणि अत्याचार केल्याचा आरोप आहे.
  • Kolhapur Rajarshi Shahu Career Academy Unnatural Sexual Assault Sanjay Lokare
  • कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील करंजोशीत गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील राजर्षी शाहू करिअर अकॅडमी मधील अध्यक्षानेच एका १५ वर्षांच्या विद्यार्थ्या सोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप असून आता या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्या त आला आहे.
  • संजय बळीराम लोकरे असे या निवासी सैनिक शाळेच्या अध्यक्षाचे नाव आहे. पायाला मालिश करण्यासाठी आपल्या खोलीत बोलावून अध्यक्षाने जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केल्‍याचे विद्यार्थ्याने तक्रारीत म्हटले आहे.
  • शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी या गावात संश यित आरोपी संजय बळी राम लोकरे हे अध्यक्ष असलेल्या राजर्षी शाहू करिअर अकॅडमीत विद्या र्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं.
  • यासाठी अनेक विद्यार्थी येथे निवासी असतात. दिनांक २६ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी संजय लोकरे याने एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला रात्री च्या सुमारास पायाला मालिश करण्यासाठी आपल्या खोलीत बोलावून घेतले.
  • पायाचे मालिश करून झाल्यानंतर फिर्यादीला रूम मध्येच झोपण्यास सांगितले. दरम्यान रात्रीच्या सुमारास सदर संशयिताने पीडित १५ वर्षीय बाल कावर जबरदस्ती करत अनैसर्गिक कृत्य केलं.
  • शिवाय कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे फिर्यादी हा पुढील काही दिवस भीतीच्या सावटाखाली होता.
  • अखेर चार सप्टेंबर रोजी फिर्यादीने शाहूवाडी पोली स ठाण्यात फिर्याद दिली असून कलम ३७७ आणि बाल लैंगिक अत्याचार कायदा आणि ॲट्रॉ सिटी ॲक्ट अंतर्गत संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला तात्काळ अटक देखील करण्यात आली आहे.
  • तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार सूर्यवंशी यांच्याकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी म्हटले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा