नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुंबईतील ‘गिल्बर्ट हिल’ चा बुर्ज खलिफाच्या धर्तीवर होणार पर्यटनस्थळ म्हणून विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मुंबईतील ‘गिल्बर्ट हिल’ चा बुर्ज खलिफाच्या धर्तीवर होणार पर्यटनस्थळ म्हणून विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : नितीन राने :- मुंबईतील गिल्बर्ट हिल चा बुर्ज खलिफाच्या धर्तीवर होणार विकास.पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येणार असल्याचे उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. काय आहे राज्य सरकारचं प्लॅनिंग…?
  • gilbert hill
  • देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या दुबईतील ‘बुर्ज खलिफा’ च्या धर्तीवर मुंबईतील ‘गिल्बर्ट हिल’ चा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात येणार असल्याचे उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
  • हा परिसर पुढील वर्षभरात विकसित करण्याचे राज्य सरकारने प्रस्तावित केले असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही लोढा यांनी दिली आहे.
  • ज्वालामुखीच्या लाव्हा रसातून जगात अनेक ठिका णी नैसर्गिक टेकड्या निर्माण झाल्या. त्यापैकी अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल ही ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेली टेकडी आहे.
  • संपूर्ण जगात अशाप्रकारे बेसाल्ट स्तंभांची रचना अगदी मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळते. सन १९५२मध्ये या टेकडीला राष्ट्रीय वारशाचा दर्जा देण्यात आला आहे.
  • सुमारे २०० फूट उंचीच्या या टेकडीच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे टेकडीच्या भवितव्याबाबत अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
  • या परिसरातील झोपड्या हटवून टेकडीचा विकास करण्याचा विचार गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या पातळीवर सुरू आहे.
  • २०२०मध्ये पालिकेच्या के पश्चिम विभाग कार्याल याने अभ्यासकांसह टेकडीची पाहणी करून पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचे प्रस्तावित केले होते.
  • पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे रविवारी एका कार्यक्रमानिमित्त या परिसरा त आले असताना त्यांनी या टेकडीचा बुर्ज खलिफा वास्तूच्या धर्तीवर राज्य सरकार विकास करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
  • गिल्बर्ट हिलला भूवैज्ञानिक वारसा म्हणून अतिशय मोलाचे स्थान आहे. या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास देश-विदेशातील पर्यटक येथे भेट देतील आणि मुंबईचे पर्यटन महत्त्व आणखी वाढेल.
  • असे नमूद करून पुढील वर्षभरात या परिसराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी राज्य सरकारच्या संबंधित विभागाला केल्या आहेत.
  • गावदेवी मंदिरासाठी लिफ्ट
  • गिल्बर्ट हिलवर गावदेवीचे मंदिर असून तिथे भावि कांना जाण्यासाठी लिफ्ट ची सुविधा देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री लोढा यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
  • सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच या प्रकल्पाला सुरूवात होईल, अशी माहिती स्थानिक आमदार अमित साटम यांनी दिली.
  • ग्रोवर गिल्बर्ट यांचे नाव
  • टेकडीचे महत्त्व आणि वेगळेपण वारंवार पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी पुढे आण ल्यानंतर मुंबई महापालिकेने या टेकडीचा पर्यटन क्षेत्रांच्या यादीत समावेश केला आहे.
  • ज्वालामुखीतून निघणाऱ्या लाव्हा रसाचे एका विशिष्ट पद्धतीने उत्सर्जन झाले की, अशा स्तंभीय रचनेची निर्मिती होते.
  • अमेरिकेचे भूगर्भशास्त्र अभ्यासक ग्रोवर कार्ल गिल्बर्ट यांनी या रचनांचा अभ्यास करून त्यांच्या जन्म रहस्यांची उकल करणारे गृहितक मांडले. त्यामुळे ही टेकडी गिल्बर्ट यांच्या नावाने ओळखली जाते.
  • मानवी उत्क्रांतीच्याही आधीचा दगड
  • ज्वालामुखीच्या उद्रेकातून ब्लॅक बेसाल्ट दगडाची बनलेली ही टेकडी पाहताना दगडाचे चौकोनी काप एकमेकांना जोडावेत अशी तिची रचना दिसते.
  • कित्येक कोटी वर्षांपूर्वी तयार झालेला हा दगड हात लावून अनुभवता येतो. मानवी उत्क्रांतीच्याही आधी तयार झालेला हा दगड असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले आहे.
  • जागतिक पातळीवर दखल घेतलेली ही टेकडी वाचवणे आवश्यक असल्याची अभ्यासकांची मागणी आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा