नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पुण्यात बसचालकांची मुजोरी; PMP बस सिग्नल तोडतात बिनधास्त, नागरिकांकडून कारवाईची मागणी. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पुण्यात बसचालकांची मुजोरी; PMP बस सिग्नल तोडतात बिनधास्त, नागरिकांकडून कारवाईची मागणी.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : ज्ञानदेव गांडुळे :- पीएमपी चालकां कडून सिग्नलचे उल्लंघन केल्याचे सर्रास दिसून येते. सिग्नल बंद असताना चालक तशीच गाडी दामटतात.
  • यात एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
  • pmp bus 1
  • एखाद्या सिग्नलला तुम्ही उभे असता आणि सिग्न ल तोडून पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस जाते. त्या वेळी इतर वाहनचालकां च्या मनात धडकी भरते.
  • अशी परिस्थिती शहरातील अनेक सिग्नलवर स ध्या दिसते आहे. पीएमपी बसचालकांकडून सर्रास सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन केले जाते.
  • पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमपीआरडीए’ च्या हद्दीत पीएमपीकडून सार्वजनिक वाहतूक सेवा दिली जाते.
  • ‘पीएमपी’ने वाहतुकीच्या नियमांबाबत काटेकोर असणे गरजेचे आहे; पण ‘पीएमपी’ बसचालकां कडून नियमांचे पालन होताना दिसत नाही.
  • त्यामुळे गेल्या काही महिन्यांत पीएमपीच्या अपघा तांमध्ये वाढ झाली आहे. त्याला चालकही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे दिसून आले आहे.
  • विशेषत: पीएमपी चालकांकडून सिग्नलचे उल्लंघन केल्याचे सर्रास दिसून येते. सिग्नल बंद असताना चालक तशीच गाडी दामटतात.
  • यात एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
  • शहरातील अनेक चौकांत पीएमपी चालकांकडून सिग्नल सुटण्याअगोदरच बस घुसवली जाते, तर कधी कधी सिग्नल बंद झाला, तरी गाडी घेऊन जात असल्याचे दिसून येते.
  • कृषी महाविद्यालयाजवळील चापेकर चौक येथे पीएमपीचालक सिग्नल तोडत असल्याचे सर्रास दिसते. स्वारगेटच्या जेधे चौधातही ‘पीएमपी’कडे सिग्नल तोडल्याचे आढळले.
  • नगर रस्त्यावरील शास्त्री चौक, खराडी बायपास, चंदननगर चौक, सिंहगड रोडवरील दत्तवाडी, राजा राम पूल, हिंगण खुर्द या ठिकाणी अधूनमधून सिग्नलचा नियमभंग केला जात आहे.
  • त्यामुळे ‘पीएमपी’चालकांना सिग्नलचे नियम नाही का असा प्रश्न विचारला जात आहे.
  • सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये ठेके दाराच्या बस चालकांचा सर्वाधिक समावेश असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगितले जाते; पण त्यांच्यावर काहीही कार्यवाही होताना दिसत नाही.
  • त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच आता यात लक्ष घालण्याची वेळ आली आहे.
  • ‘पीएमपी’वरील कारवाईची माहिती नाही
  • वाहतूक पोलिसांकडून ट्रिपल सीट, सिग्नल तोड णाऱ्यांच्या दुचाकी व चार चाकी चालकां विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते; पण सिग्नल तोडणाऱ्या पीएमपीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळले.
  • आतापर्यंत नियमभंग करणाऱ्या पीएमपीवर किती कारवाई केली, याची माहिती देखील पोलिसांकडे उपलब्ध नाही.
  • सिग्नल तोडणाऱ्या पीएमपी चालकांवर कारवाई करून त्यांच्या पगारातून दंड वसूल केल्यास त्यां च्यावर वचक बसेल; पण त्यासाठी वाहतूक पोलि सांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.
  • पीएमपी प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा