नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- दि ५ सप्टेंबर २०२३
    शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट स्मशानभूमी ( धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.
  • यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांना पुष्प चक्र अर्पण करून मानवंदना दिली.
  • शहीद दिलीप बाळासाहेब ओझरकर यांचे वडील बाळासाहेब ओझरकर आणि लहान मुलगा यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
  • यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, सुनील कांबळे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड (नि.)उपसंचालक लेफ्टनंट कर्नल आर.आर.जाधव (नि.) , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनं ट कर्नल एस. डी. संगे (नि.),लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
  • कारगिल येथे देशसेवा बजावत असतात ३ सप्टेंबर रोजी दिलीप ओझरकर शहीद झाले होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा