नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या दोन अल्पवयीन मुलांची पोलिसांनी सहीसलामत केली सुटका. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या दोन अल्पवयीन मुलांची पोलिसांनी सहीसलामत केली सुटका.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : माधवी चंदरकी :- येथील झोपडपट्टी तून भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या दोन अल्पवयीन मुलांची पोलिसांनी दहा दिवसांनी हैद राबाद येथून सहीसलामत सुटका केली.
  • हैदराबाद येथे रेल्वेस्थानकावर भीक मागताना त्या मुलांना आई-बाबांची आठवण आली, त्यांनी एका प्रवाशाकडील मोबाईलवरून घरी फोन केला,
  • त्यानंतर मुलांचे लोकेशन निश्‍चित झाले व तातडीने पोलिसांनी घटनास्थ ळी जाऊन मुलांना ताब्यात घेतले.
  • या मुलांचे अपहरण केलेल्या काजल सुधाकर सूर्यवंशी (वय ३५, रा. कनान नगर, कोल्हापूर) या महिलेला पोलिसांनी अटक केली.
  • पोलिस निरीक्षक अजय सिंदकर आणि अपहरण झालेल्या मुलांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार, झोपडपट्टीतून अपहरण झालेल्यां मध्ये एका अकरा वर्षांच्या मुलीचा आणि बारा वर्षांच्या मुलाचा समावेश होता.
  • दोघांचे अपहरण एका भीक मागणाऱ्या महिलेने केल्याचा संशय कुटुंबीयांनी २७ ऑगस्टला पोलिसांत दिलेल्या फिर्यादीतून व्यक्त केला होता. तसेच संबंधित महिलेचे छायाचित्रही पोलिसांना दिले होते.
  • अपहरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मिरज, गोव्यासह कोल्हापुरात त्यांचा शोध सुरू ठेवला होता.
  • दरम्यान, आईची आठवण येत असल्यामुळे अपह रण झालेल्या मुलाने हैदराबाद येथे रेल्वे स्थानका वर एका प्रवाशास विनंती करून त्याच्या मोबाईल वरून घरी फोन केला.
  • मात्र, अनोळखी नंबर असल्यामुळे तो उचलला नाही. पुन्हा त्या नंबरवर फोन केल्यानंतर लहान मुलाने हैदराबादहून फोन केल्याचे त्या प्रवाशाने सांगितले.
  • यावर कुटुंबीयांनी तातडीने याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या क्रमांकावर मुलाचे छायाचित्र व्हॉटस्‌ ॲपद्वारे पाठविले.
  • तेव्हा त्या प्रवासी व्यक्तीने हाच मुलगा होता असे सांगितले. यानंतर हैदराबाद रेल्वेस्थानकाच्या पोलिसांना याची माहिती दिली.
  • त्यांनी रेल्वेस्थानकावर शोध घेतला. त्यावेळी तेथील एका सिग्नलवर ही मुले भीक मागत असल्याची आढळली.
  • पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कोल्हापुरातील पोलिसांशी आणि मुलांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. पोलिसांनी मुलाच्या नातेवाईकांना तातडीने हैदराबादला बोलविले.
  • दरम्यानच्या काळात शाहूपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, कॉन्स्टेबल लखन पाटील, विशाखा पाटील हे हैदराबाद येथे चौकशी साठी पोहोचले.
  • त्यांनी दोन्ही अल्पवयीन मुलांसह अपहरण करणा ऱ्या महिलेलाही कोल्हापुरात आणले. महिलेला अटक केली असून, दोन्ही अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात ठेवले असून कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्‍यात येणार आहे.
  • दादा मला न्यायला ये… परत कोठे जाणार नाही…
  • अल्पवयीन मुलीने हैदराबादमधून पोलिसांच्या फोनवरून बोलताना ‘दादा मला न्यायला ये…’ असे सांगितले.
  • दरम्यान तिला सुखरुप येथील सुधारगृहात आण ल्यावर भाऊ तिला प्रत्‍यक्षात भेटला तेव्हा तिने जवळ येऊन ‘परत कोठेही जाणार नाही…’ असे सांगितले. यावेळी तिचा कंठ दाटून आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा