नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्वप्नाली सावंत खून प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उघड. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

स्वप्नाली सावंत खून प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उघड.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : चंद्रकांत धनवडे : स्वप्नाली सावंत खून प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
  • संशयित मुख्य आरोपीने पोलि सांची  दिशाभूल करण्यासाठी वापरलेला मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना वर्षानंतर यश आले. एका निनावी पत्राने याचा उलगडा झाला आहे.
  • गुन्ह्यात जप्त केलेल्या गाडीच्या सनरुफ च्या क प्प्यात हा मोबाईल सापडला. याचे कॉल तपासून कोणी खुनाच्या गुन्ह्यात सामी ल असल्याचे निष्पन्न झाल्यास पुरवणी दोषारोप पत्र सादर केले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
  • या खूनप्रकरणी एक एक माहिती पोलिसांच्या पथ्यावर पडत आहे. या आधी घरा जवळून जप्त केलेल्या मानवी अवशेषांचा डीएनए अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
  • मांस आणि दाताचा डीएनए जुळला असल्याने तो मृतदेह स्वप्नाली सावंत यांचाच असल्याचे अहवा लात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
  • स्वप्नाली यांचा मोबाईल पोलिसांना सापडत नव्ह ता. पोलिस त्या मोबाईलच्या शोधात होते. नंतर तो पोलिसांना विहिरीत सापडला होता.
  • मात्र त्यातून अपेक्षित काही मिळू शकले नाही; परंतु एका निना वी पत्राने पोलिसांचे हे काम सोपे केले. हा मोबाईल भाई सावंत यांच्या गाडीच्या सनरुफ च्या कप्प्यामध्ये असल्याचे पत्रात म्हटले होते.
  • पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, तो मोबा ईल पोलिसांना सापडला आहे. खुना दरम्यान स्वप्नाली सावंत यांच्या मोबाईल मधील सीमकार्ड काढून मोबाईल विहिरीत टाकला होता.
  • त्यानंतर मुख्य संशयित आरोपी भाई सावंत यांनी नवीन मोबाईल घेऊन तो गाडीच्या सनरुफमध्ये लपवून ठेवला होता.
  • त्यामुळे स्वप्नाली सावंत हिचे लोकेशन हरचिरी, लांजा या दरम्यान दाखवले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुख्य संशयिताने हा कट रचला होता.
  • या मोबाईलमधील सीम पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा सीडीआर काढला जाणार आहे. यातून घटने च्या दरम्यान ज्यांचे ज्यांचे कॉल झाले आहेत किंवा आले आहेत, त्यांची चौकशी केली जाणार आहे.
  • खुनाच्या गुन्ह्यात त्यापैकी कोण सहभागी असल्या चे तपासात निष्पन्न झाले, तर त्यालाही आरोपी करून पुरवणी दोषारोपपत्र दिले जाणार आहे.
  • राख गोणपाटात भरून टाकली
  • पोलिसांनी यापूर्वीच यातील मुख्य संशयित आरोपी सुकांत गजानन सावंत, रूपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या ऊर्फ प्रमोद गावणंग यांना अटक केली आहे.
  • खून केल्यानंतर स्वप्नाली सावंत यांचा मृतदेह जाळून त्याची राख गोण पाटात भरून टाकली जात होती. बहुतांश राख समुद्रात टाकली.
  • परंतु थकल्यानंतर संशयितांनी उर्वरित राख घरा च्या बाजूला टाकली होती. त्यामध्ये पोलिसांना स्वप्नाली सावंत यांची जोडवी, मांस आणि दात सापडला होता.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा