नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ढोल-ताशा पथकात सरावासाठी कोंढवा येथे गेलेल्या १६ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा सासवड परिसरात खून. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

ढोल-ताशा पथकात सरावासाठी कोंढवा येथे गेलेल्या १६ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा सासवड परिसरात खून.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : नामदेव मेहर :- अल्पवयीन मुलगा ढोल ताशा पथकात सरावासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरीच आला नाही.
  • त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठून तो बेपत्ता असल्याची तक्रार कोंढवा पोलिसांत रविवारी दिली.
  • Dhol tasha pathak
  • ढोल-ताशा पथकात सरावासाठी कोंढवा येथे गेले ल्या १६ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा सास वड परिसरात खून करण्यात आल्याची धक्कादा यक घटना उघडकीस आली आहे.
  • प्रतिस्पर्धी टोळीला माहिती दिल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचा टोळक्याने खून केल्याची माहि ती प्राथमिक तपासात मिळाली आहे.
  • याप्रकरणी दोन सराईतांना पोलिसांनी अटक केली आहे. साईराज लोणकर (वय २५, रा. कोंढवा खुर्द) आणि ओंकार कापरे (वय २५, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. लोणकर आणि कापरे सराईत गुन्हेगार आहेत.
  • याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दहा ते अकरा जणां वर गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा कोंढव्यातील शिवनेरीनगर भागात राहायला आहे. शनिवारी (२ सप्टेंबर) तो ढोल ताशा पथका त सरावासाठी गेला होता.
  • रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार कोंढवा पोलिस ठाण्यात रविवारी दिली.
  • प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अल्पवयीन मुलाबरोबर गेलेला एकजण कोंढव्यातील घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
  • त्याच्या पायाला जखम झाली होती. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. लोण कर आणि कापरे यांनी अल्पवयीन मुलाचे अपह रण करून त्याला सासवडला नेले. तेथे त्याला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला.
  • मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली.
  • त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथी दारांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस निरी क्षक संदीप भोसले तपास करीत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा