नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष यांचा चांदवड ट्रॉमा केअर सेंटर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सेवासुविधा नसल्याने आंदोलनाचा इशारा. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष यांचा चांदवड ट्रॉमा केअर सेंटर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सेवासुविधा नसल्याने आंदोलनाचा इशारा.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ (आर के मामा):- चांदवड शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी फार जुन्या काळा पासून गोरगरिबांना आरोग्याच्या माध्यमातून जीवदान देणार ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात असुन.
  • ज्या गरीब जनतेकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांना आरोग्याच्या समस्यांबाबत या रुग्णालयात औषधोपचार घेऊन जीवन जगण्यासाठी दुसरा पर्याय नाही.
  • अशा या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना पूर्वीच्या काळात जी सेवा मिळत होती त्यापेक्षाही घाणेरडी सेवा चांदवड ट्रॉमा केअर सेंटर उपजिल्हा रुग्णाल याची निर्मिती झाल्यानंतर मिळत आहे.
  • पूर्वीच्या काळात या ग्रामीण रुग्णालयात राजकीय वर्चस्वातून डॉक्टर हा फॅक्टर हस्तक्षेप नसल्याने जनता सुखी होती.
  • वशिल्याची गरज नव्हती. राजकीय आकसापोटी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी बोगस सर्टिफिकेट मिळत नव्हते.
  • पुरेशी यंत्र सामुग्री उपलब्ध नसताना देखील ग्रामी ण रुग्णालयाच्या त्या पूर्वीच्या काळात तेव्हाच्या परिस्थितीनुसार रुग्णांना सेवा दर्जेदार मिळत होती.
  • तात्कालीन डॉक्टर यांना सेवा करतांना नोकरीत अडचण, दडपण नव्हते. पण आता मात्र आई भीक मागू देत नाही आणि बाप पदर पसरू देत नाही.
  • अशा या ठिकाणी राजकीय माध्यमातून निवडून आलेले नेत्यांच्या डॉक्टर या फॅक्टर हस्तक्षेपामुळे सेवा करतांना बिकट परिस्थिती नोकरदार वर्गाची झालेली आहे.
  • या ठिकाणी डॉक्टरांना नोकरी करणे मोठे आडच णीचे ठरत आहे.
  • या ग्रामीण रुग्णालयात जनतेच्या सेवेसाठी शास नाने व्हेंटिलेटर मशिन, सोनोग्राफी मशिन, एक्सरे मशिन, डायलिसिस मशिनरी अशी लाखों रुपयांची पुरेशी यंत्रसामुग्री दिलेली आसतांना या रुग्णालया त मनुष्यबळाचा अभाव आहे.
  • या ठिकाणी मशिनरी चालविणारे टेक्निकल कर्म चारी नियुक्त नाही.
  • असे निमित्त दाखवुन अक्षरशः या ठिकाणी आसलेल्या काही रुग्ण खाटा, डायलिसिस मशिनरी, व्हेंटिलेटर मशिनरी वस्तु गहाळ झालेल्या आहेत.
  • तर काही यंत्रसामुग्री कित्येक वर्षापासून धूळखात बंद अवस्थेत पडलेल्या असुन सेवा वापरात नाही.
  • चांदवड तालुक्यात निवडून दिलेल्या राजकीय खा सदार, आमदार, जि.प. सदस्य हे सर्व नेते डॉक्टर असुन यांची या ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवेत आसलेले नोकरदार यांचेवर मोठी दहशत असल्या ने यांना गहाळ केलेल्या यंत्र सामुग्रीबाबत, पुरेशी सेवा देणेबाबत स्पष्ट भूमिकेतून बोलता येत नाही.
  • रुग्ण सेवा करणाऱ्यांना त्यांच्या समस्या सोडवि ण्यासाठी तोंड बांधुन मुक्याचा मार असा प्रकार झालेला आहे.
  • आता मात्र अलीकडच्या काळात या ग्रामीण रुग्णा लयावर देखभाल करण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञा नाचा वापर करून प्रगती होण्यासाठी गरीब जनतेने विश्वास ठेवत राजकीय निवडणुकांच्या माध्यमातून खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, अशी सर्व नेते मंडळी स्वतः डॉक्टर असून यांनी जनतेचा विश्वास घात करीत डॉक्टर हा फॅक्टर निवडून हस्त क्षेप करून चांदवड ट्रॉमा केअर सेंटरचे बनविले ड्रामा केअर सेंटर “सुखसुविधा शुन्य” करून यांचे हस्तक्षेपामुळे रुग्णांची फसवणूक केली जात आहे.
  • गोरगरीब जनतेला आरोग्याच्या दृष्टीने दिलासा देणारे उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव आसल्याने रुग्णांना जीवघेण्यासारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.
  • मागील आठवड्यात अक्षरशः पातरशेंबे येथील १३ वर्ष वयाच्या मुलीला व्हेंटिलेटर सुविधेअभावी प्राण गमवावा लागला.
  • आजही दुगाव येथील ग्रापंचायत कार्यालयास सुख सुविधा मिळणेबाबत ठराव पारीत करावा लागला. आमदारांना निवेदन द्यावे लागले.
  • आजही चांदवड येथील रहिवाशी पंकज राऊत यांची बहीण आजारी आसल्याने या रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा आहे.
  • पण सेवा नसल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ येऊन लाखो रुपये खर्च करून कर्ज बाजारी होण्याची वेळ त्यांचेवर आली आहे.
  • मागील काळात देखील कुत्र चावल्याने, सर्पदंशाने, सुविधांअभावी बऱ्याच अंशी लोकांना जीव गमवावे लागले. अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
  • पहा हे चांदवड तालुक्यातील जनतेचे दुर्दैव चांदवड येथील लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारतीताई पवार स्वतः डॉक्टर असुन जनतेच्या आशीर्वादाने केंद्रात पंतप्रधानांच्या निकटवर्तीय या केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री आहेत.
  • पूर्वीचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दौलतराव आहेर यांचे अनुभवी चिरंजीव लोकप्रतिनिधी आमदार डॉ. राहुल दादा आहेर हे देखील सततचे
    हॅट्रिक आमदार आहेत.
  • तसेच डॉ आत्माराम कुंभार्डे हे देखील जिल्हा परि षद सतत दडपशाहीखाली ठेवणारे जिल्हा परिषदे चे भाजपा गट नेते आहेत.
  • डॉ.सयाजीराव गायकवाड हे माजी अनुभवी आमदा रांचे चिरंजीव सरळ वृत्तीचे जन माणसातले भवि ष्यातील अपेक्षावादी नेते आहे.
  • असे सर्व डॉक्टर वर्गीय नेते लोकांनी लोकांच्या सेवेसाठी विश्वासाने निवडून दिले. यांच्यामध्ये डॉ. गायकवाड सोडले तर भारतीताई पवार, राहुल आहेर, भाजपा गटनेते हे सर्व सत्ताधारी पक्षाचे नेते असून यांनी मात्र जनतेची दिशाभूल करीत जनते ची सेवा करण्याऐवजी गरीब जनतेला न्यायमाग णीसाठी रस्त्यावर बाहेर काढले आहे.
  • ही बाब न्यायाला खाजविणारी, अन्याय करणाऱ्या ला माजविणारी, तुमच्या हातात दिलेल्या सत्तेला लाजविणारी आहे. आणि जनतेच्या अपेक्षांची आशावादी पेटलेली ज्योत विझविणारी आहे.
  • आजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. उतु नका, मातू नका जनतेला न्याय दिल्याशिवाय राहू नका. जनतेने प्रखर विश्वासाने सेवा करण्यासाठी मताचे भीक तुमच्या झोळीत टाकलेले आहे.
  • निवडून दिलेले आहे ते तुमच्या विकासासाठी नाही.
    तर जनतेच्या सेवेसाठी.
  • चांदवड ट्रामा केअर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे सुखसुविधांयुक्त सेवेसाठी सर्वच लोकसेवक डॉक्टरांचा मेळा गोळा झालेला आहे.
  • स्वतंत्र अमृत महोत्सव योग आसतांना रुग्ण सेवा हिच ईश्र्वर सेवा समजुन सर्व डॉक्टर सत्तेच्या माध्यमातून सेवा करण्यास एकत्र निवडून येण्याचा हा पुण्ययोग आहेत. संधीचे सोने करण्याची वेळ आली आहे.
  • चांदवड ट्रॉमा केअर सेंटर उपजिल्हा रुग्णालय येथे एक महिन्याच्या आत सर्व यंत्र सामुग्री व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून नावाप्रमाणे व दिलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जप्रमाणे सेवा प्राप्त करून देण्याची कार्यवाही करावी आणि दखल घेऊन कार्यवाही केली नाही.
  • तर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर आंदोलनाचे हत्यार हाती घेतल्याविना राहणार नाही.
  • याबाबत सबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. आव्हाड यांना प्रहार कार्यकर्त्यांच्या उपस्थित निवेदन देऊन गणेश निंबाळकर यांनी गरीब जनतेच्या सेवेची जाणीव करून दिली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा