नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दरवर्षी सरासरी २०० दिवसांची बंदोबस्त ड्यूटी; मात्र कुटुंबासाठी. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

दरवर्षी सरासरी २०० दिवसांची बंदोबस्त ड्यूटी; मात्र कुटुंबासाठी.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : सचीन गीरी :- सभा, मोर्चा, आंदोल ने, सण-उत्सव, मंत्र्यांचे (व्हीआयपी) दौरे याठि काणी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी असते. वर्षात सरासरी २०० दिवस पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागत आहे.
  • त्यानंतर आपल्याकडील गुन्ह्यांचा तपास वेळेत लावणे, पुन्हा रात्रगस्ती अशा कारणांमुळे पोलिसां ना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याची स्थिती आहे.
  • बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास आणि कौटुंबिक जबाब दारी, याचा मेळ बसत नसल्याने अनेकजण तणा वाखाली असल्याचे बोलले जात आहे.
  • राज्यातील सत्तासंघर्षामुळे नेत्यांच्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात सभा होत आहेत. त्यातच पुन्हा विविध विषयावरून आंदोलने, मोर्चे सुरुच आहेत.
  • त्यामुळे पोलिसांना तपासकाम बाजूला ठेवून वारं वार बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागत आहे.
  • आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीही पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो.
  • दरम्यान, आता सण-उत्सवाचा काळ असून पुन्हा ऑक्टोबर पासून निवडणु कीचा बंदोबस्त असणार आहे.
  • दिवाळीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां ची शक्यता असून एप्रिलनंतर लोकसभा आणि त्यानंतर विधानसभे ची निवडणूक होईल.
  • त्यावेळी देखील पोलिसांना सतत बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागणार आहे. त्यामुळे पोलिस अंमलदारांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देत येईना, अशी स्थिती आहे.
  • कोरोना काळात त्याचा अनुभव सर्वांनाच आला. सद्य:स्थितीत अंमलदारांना बऱ्याचदा हक्काच्या सुट्या देखील घ्यायला अडचणी निर्माण होत आहेत.
  • अंदाजे ३० टक्के अंमलदारांना बीपी, शुगर
  • सोलापूरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अंदाजे ३० टक्के पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांना मधु मेह (शुगर) व उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे चित्र आहे. अनेकांना वेळेत त्याची माहिती देखील होत नाही.
  • राज्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणा ऱ्या पोलिसांच्या आरोग्या साठी ठोस उपाययोजनां ची गरज असून गृह विभागाने पोलिस अधिकारी व अंमलदारांची संपूर्ण रिक्त पदे भरण्याची आवश्य कता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
  • सध्या ४० वर्षांवरील अंमलदारांना वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणीसाठी पाच हजार रुपये मिळतात, तर ४० वर्षांखालील अंमलदारांना वर्षातून एकदाच तेवढी रक्कम मिळते. त्यात वाढ करणे काळाची गरज आहे.
  • पोलिसांची अजूनही २० हजार पदे रिक्तच
  • गृह विभागाने काही दिवसांपूर्वी १९ हजार पोलिस अंमलदारांची भरती केली. त्यांचे सध्या प्रशिक्षण सुरु असून ते सेवेत दाखल व्हायला अजून १० महिने लागणार आहेत.
  • दुसरीकडे अद्याप गृह विभागाकडे १६ ते २० हजार पदे रिक्त आहेत, पण प्रशिक्षणाची सोय नसल्याने त्यांची भरती पुढील टप्प्यात होईल, असे विश्वस नीय सूत्रांनी सांगितले.
  • अनेक शहरांचा विस्तार झाला, लोकसंख्याही वाढली, मात्र मनुष्यबळ व पोलिस ठाणी तेवढीच आहेत. त्यामळे एका गुन्ह्यांचा तपास पूर्ण होण्या पूर्वी लगेचच दुसरा गुन्हा त्यांच्याकडे सोपविला जातोय, अशी वस्तुस्थिती आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा