नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बंद घराच्या दरवाज्याचे कुलुप काढुन ,कपाटातील 71 हजार रुपयाचे सोन्याच्या दागिण्याची चोरी. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

बंद घराच्या दरवाज्याचे कुलुप काढुन ,कपाटातील 71 हजार रुपयाचे सोन्याच्या दागिण्याची चोरी.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : शकील मुलानी :- बंद घराच्या दरवा ज्याचे कुलुप काढून, आतील लोखंडी कपाटातील सुमारे 71 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याची घटना नरखेड ता मोहोळ येथे ता 14 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.
  • मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मालिकाप्पा बुगाप्पा नाईकवडे हे नरखेड येथे शेती करतात.
  • शेतात काम जास्त असल्याने नाईकवडे कुटुंब हे शेतातून गावातील घराकडे ये जा करीत असतात. ता 14 ऑगस्ट रोजी नाईकवडे हे गावात येऊन गावातील सर्व काम आटोपून घराला कुलूप लावून शेतातील घरी गेले.
  • 15 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नाईकवडे हे घरी आले असता त्यांना घराच्या दरवाज्याचे कुलूप काढून दरवाजा उघडा असल्याच्या अवस्थेत दिसून आले.
  • घरात गेल्यावर पाहिले असता घरातील लोखंडी कपाटाचेही दार उघडे दिसले, कपाटातील कपडे व अन्य वस्तू इतरत्र पडल्याचे दिसले.
  • कपाटातुन सोन्याच्या अंगठ्या, कानातील झुबे, सोन्याचे वेल व कर्णफुले असा एकुण 70 हजार 500 रुपयांच्या सोन्याचे दागिने घरी कोणी नाही याची संधी साधुन चोरीस गेल्याचे नाईकवडे यांच्या लक्षात आले.
  • या घटनेची फिर्याद मलिकाप्पा नाईकवडे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार गणेश पोफळे करीत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा