देशभरातील मजूर रोजगारासाठी महाराष्ट्रात मग महाराष्ट्राला हिंदीची नव्हे इतर राज्यांना मराठी सक्तीची करा ; कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी.

  • प्रतिनिधी : मुंब‌ई : प्रमोद तरळ :- देशभरातील मजूर म हाराष्ट्रात रोजगारासाठी येते असल्याने महाराष्ट्राला हिंदी ची नव्हे तर इतर राज्यांना मराठी भाषेची सक्ती करावी अशी मागणी केली.
  • कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने देशाचे सन्मा. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
  • केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानूसार त्रिभाषासुत्र अंगीकारून फडणविस सरकार राज्यातील सर्व शाळांम ध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करीत आहे.
  • लहान मुलांच्या बुद्धीमत्तेचा विचार करता महाराष्ट्र राज्या त याचे तिव्र पडसाद उमटत आहेत.
  • शैक्षणिक धोरणाच्या आडून राज्यसरकार महाराष्ट्र ह्या म राठमोळया राज्याला हिंदी भाषीक करण्याचा डाव आख त आहे त्याला प्रवासी संघटनेने तिव्र शब्दात निषेध नोंदव ला आहे.
  • स्वातंत्र्योंत्तर काळात भाषावार प्रांतरचना झाली त्यामध्ये मराठी भाषीकांच्या महाराष्ट्र राज्याला मान्यता मिळाली, देशातील ४ ते ५ हिंदी भाषीक राज्ये वगळता इतर सर्वच राज्याना स्वतःची मायबोली भाषा आहे.
  • महाराष्ट्र हे रोजगार निर्मिती करणारे समृद्ध राज्य आहे म ग त्याला मजूरांच्या हिंदी भाषेची सक्ती का? असा सवाल प्रवासी संघटना आपल्या निवेदनात विचारतेय.
  • भारताचे आदरनिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी साहेब अ र्धा देश महाराष्ट्र राज्याच्या मुंबईत येऊन स्वतःचे पोट भर त असेल तर महाराष्ट्राला हिंदीची नव्हे तर देशाला मराठी भाषा शिकण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
  • अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या कडे मागणी केली आहे.
  • हिंदूस्थानात अनेक राजे होते पण मराठ्यानींच १७६१ म ध्ये दिल्लीच्या तख्खासाठी अब्दालीला पाणिपतात रोखले होते ना,तसेही भारतावर इंग्रजांपुर्वी अफगानिस्तानातील अटकेपासून कन्याकुमारीपर्यंत मराठयांचे शेवटचे राज्य होते.
  • त्यांनी १८१८ च्या युद्धात हिंदूस्थानाला मराठी माणसाक डूनच हिसकावून घेतले होते,तेव्हा सर्वात मोठी बोलीभाषा ही मराठी होती.
  • त्यामुळे आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हिंदीची न व्हे तर मराठी भाषेची देशातील सर्व संघराज्यांमध्ये मोदी सरकारने सक्ती करावी,ही नम्र विनंती.
  • अरबांची भाषा उर्दु होती मुघलांच्या राजवटीत तिचा अप भ्रंश होऊन ती हिंदी झाली त्यामुळे मुघलांची हिंदी भाषा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला नकोय.
  • बाहेरून येणाऱ्या परप्रांतियांना रोजगार महाराष्ट्राचा हवा य, पाणी,विज,रस्ते,सुरक्षा आणि इतर सर्व सुखसुविधा म हाराष्ट्र राज्याच्या हव्यात मग येथील मराठी भाषा पररा ज्यातील लोकांना शिकायला नको का?
  • प्राचीन काळापासूनच महाराष्ट्र राज्याची भूमी ही सुजलाम सुफलाम आणि सुसंस्कृत आहे, आज मुंबईच्या रूपाने म हाराष्ट्र राज्याने देशाला औद्योगिक आणि मायावीनगरी दि लेली आहे,येथे दररोज लाखो परप्रांतियांचे लोंढे रोजगारा च्या अपेक्षेने येत आहेत.
  • म्हणून मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे.उत्तरेतील गु जरात, राजस्थान,उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश, बिहार,झारखंड, उ त्तराखंड,पश्चिम बंगाल, ओरिसा, कर्नाटक,केरळ, तामिळ नाडू हया सर्वच मागास आणि अकार्यक्षम राज्ये स्वतःच्या राज्यातील लोकांना रोजगार देऊ शकत नाहीत परिणामी या राज्यातील लाखो मजूरांचे लोंढे पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात येत आहेत.
  • साधारणत: आज वरील राज्यांच्या अर्ध्या लोकसंख्येला म हाराष्ट्र भाकरी पुरवतोय,त्यामुळे त्यांच्या राज्यात मराठी भाषेची सक्ती करावी याच्याने महाराष्ट्रात आल्यानंतर भा षिक वाद उत्पन्न होणार नाहीत शिवाय त्यांनाही येथील दै नंदिन कामकाजामध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत.
  • पिकतं तेथे विकल जात नाही सिद्धान्त अर्थशास्त्रात पिक त तेथे विकल जात नाही असा प्रसिद्ध सिद्धान्त आहे.
  • परराज्यातून महाराष्ट्रात नोकरी आणि उद्योगासाठी आले ल्या अनेकांनी आपल्या राज्यात जाऊन उद्योग व्यवसाय करण्याचे प्रयत्न केले मात्र वरील पंक्तीप्रमाणे त्यांना ते शक्य झाले नाही.
  • हे आपणही मुंबईतील प्रसिद्ध डायमंड व्यापार सुरतला ने ऊन पाहीला पण पुढे त्याचे काय झाले? परत मुंबईच यावे लागले ना, आपणही महाराष्ट्र राज्यातील अनेक उद्योग व्यवसाय गुजरातला नेलेत पण किती गुजराती मजूरांनी गुजरातला स्थलांतर केले?
  • इतकेच काय तर आमच्या मुंबईच्या फुटपाथवर उत्तरभार तीय,मारवाडी, गुजराती व मद्रासी लोकांनी मोठया प्रमाणा त कब्जा करून भाजी,फळे, कपडे,वडापाव,चहा यांचे मो ठया प्रमाणात ठेले लावलेले आहेत,
  • का त्यांच्या राज्यांत रस्त्यांवर फुटपाथ नाही आहेत का? आहेत, पण परिस्थिती पुरक नाही,म्हणून त्यांना व्यवसाय करण्यासाठी १२०० किमी वर महाराष्ट्रातच यावे लागतेय.
  • आपणही Make in India च्या माध्यमातून उत्तरप्रदेश व हरयानाच्या सिमेवर नोएडा नावाची मोठी इंडस्ट्रीज उभी केली आहे.
  • ती उत्तरप्रदेश,बिहार व झारखंड श्रमिक कामगार असणा ऱ्या या राज्यांना जवळचीही आहे मात्र तरीही या राज्याती ल मजूर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्याची रोजगारासाठी निवड करतात.
  • कारण महाराष्ट्र राज्य प्रगतशिल, महिलांसाठी सुरक्षित व कायदा सुव्यवस्था असलेले राज्य आहे.
  • साहेब,आपण तर जनतेचे सेवक म्हणवता तर कृपया केंद्र सरकारने देशाती ल सर्वच राज्यांमध्ये मराठी भाषा सक्ती ची करण्याचा अध्यादेश काढावा.
  • अशी मागणी प्रवासी संघटनेने केली असून त्यांच्या प्रति, मुंख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, उपमुंख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, श्री.अजित पवार, शिक्षणमंत्री श्री.दादा भूसे व मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांना पाठवल्या असून त्यावर अ ध्यक्ष श्री.शेखर बागवे व सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यां नी सह्या केल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles