नियोजन समितीच्या बैठकीत पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य; पालकमंत्री विखे-पाटील.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : योगेश सुळे :- जिल्ह्यात अनेक तालु क्यात कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.
- निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगा ने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे तसेच त्याबाबत सूक्ष्म नियो जन करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्ष तेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.
- या बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ओमराजे निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, शहाजी पाटी ल, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील ,यशवंत माने, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महा पालिका आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा परिष देच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजि ल्हाधिकारी शमा पवार तसेच जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
- जिल्हा नियोजन भवन येथे पाणीटंचाई उपलब्धता नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री विखे-पाटील बोलत होते.
- पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, की टंचाई काळा त पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यास अडचण भासणार नाही. प्रशासनाने पिण्याच्या पाण्या पासू न एकही गाव वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- जिथे पिण्याच्या पाण्याचे टँकरची मागणी आहे तिथे तातडीने टँकर उपलब्ध करून द्यावेत. संभाव्य दुष्काळाच्या परिस्थितीमुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे व त्याबाबत जनजागृती करणे आव श्यक आहे.
- चारा टंचाईवर मात करण्यासाठी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणच्या शेत कऱ्यांना चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांची नावे पशुसंवर्धन विभागाने तत्काळ नोंदणी करून चारा डेपो सुरू करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
- विमा भरणारे शेतकरी पाच लाखांवर
- राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत पीक विमा योजना सुरू केली. मागील वर्षी जिल्ह्यातील एक लाख ९० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता.
- तर एक रुपयात पीकविमा योजनेमुळे जिल्ह्यातील ५ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वा द यांनी दिली.
- १५ टॅंकर सुरू; ११ विहिरीचे अधिग्रहण
- माळशिरस तालुक्यात आठ गावांना आठ टँकरद्वारे व सांगोला तालुक्यात पाच गावांना सहा टँकरद्वारे माढा एका गावाला एक टँकरद्वारे पिण्याचा पाण्या चा पुरवठा चालू आहे.
- सध्या बार्शी तालुक्यात दोन विहिरी व तीन विंधन विहिरींचे पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी अधिग्र हण करण्यात आले आहे.
- माळशिरसमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याकरिता आठ विहिरींचे अधि ग्रहण करण्यात आले आहेत व माढा तालुक्यात एका विहिरीचे अधिग्रहण करण्या त आले आहे.
- बैठकीतील मुद्दे येत नाहीत इतिवृत्तात
- नियोजन समितीच्या बैठकीत झालेली संपूर्ण चर्चा रेकॉर्डवर न घेता, निवडक मुद्देच घेतले जात अस ल्याने तीन बैठकीत चर्चा होऊनही ते प्रश्नच सुटत नाहीत, अशी तक्रार काही सदस्यांनी केली.
- अनेक विषयांवर बैठकीत चर्चा होते, मात्र त्याची नोंद होत नाही. सदस्यांनी केलेल्या सूचनांची दख लच घेतली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली असून, या बैठकीतील सर्व मुद्द्यांची नोंद घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.
- सोलापूरच्या खासदारांचे मौन,ओमराजेंनी मांडले अनेक प्रश्न
- धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात बार्शी तालुक्याचा समावेश आहे. त्यांनी एका तालुक्यासाठी सर्व विभागाचे प्रश्न विचारले.
- विशेष म्हणजे ते फक्त दुपारच्या सत्रात उपस्थित होते. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वा मी दिवसभर बसून होते. त्यांचे गुरुवारी मौनव्रत असते.
- आपले प्रश्न ते लेखी सादर करू शकले असते. मात्र, दिवसभरात केवळ विमा नतळाच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पत्र पाठविले असल्याचा संदर्भ त्यांनी खासदार ओमराजे यांच्या करवी मांडला.
- दिवसभरात एकही प्रश्न मांडला नाही. सोलापुरा तील अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न असतानादेखील खासदरांनी कोणताही प्रश्नविचारला नाही.
- दोन्ही देशमुख गैरहजर
- शहरातील समस्या मांडण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे दोन्ही आमदार हजर नव्हते.
- यामुळे विरोधी पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यां ना एकट्याला दोन्ही भूमिका निभवाव्या लागल्या. भाजपचे आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देखमुख हे दोघेही गैरहजर होते.
- मागील वर्षीचा सर्व निधी खर्च
- मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीने मंजूर असलेला निधी ६८२ कोटींचा निधी शंभर टक्के खर्च केलेला आहे. यावर्षीचाही मंजूर असलेला ७४५.२८ कोटीचा निधी वेळेत खर्च करावा, अशी पालकमंत्र्यांनी केली.
- प्रत्येक शासकीय यंत्रणेला मंजूर असलेल्या निधी बाबत संबंधित लोकप्रति निधीच्या ही सूचना घ्या व्यात.
- त्याप्रमाणे सूक्ष्म नियोजन करून नियोजन समिती ला प्रशासकीय मान्यतेसाठीच प्रस्ताव तत्काळ सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
- उत्सव काळात ठेवा कायदा व सुव्यवस्था
- जिल्ह्यात विविध सार्वजनिक उत्सवाच्या अनुषंगाने कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणा र नाही, याबाबत पोलिस विभागाने योग्य ती खब रदारी घेऊन सुरक्षा व्यवस्था चोखपणे ठेवावी.
- गणेशोत्सव तसेच अन्य सण-उत्सव साजरे करता ना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या आदेशां चे पालन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
- दररोज सरासरी ५५ पशू लम्पी बाधित
- जिल्ह्यात सात लाख ४५ हजार ३२४ गोवंशीय पशु धन आहे. जिल्ह्यात १ एप्रिल ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५८१ जनावरांचा मृत्यू झाला असू न, ६ हजार ८७९ पशुधन बाधित होते.
- उपचाराने ५ हजार ३२८ जनावरे बरे झाली आहेत. दररोज सरासरी ५५ पशुधन बाधित होत आहे.
- जिल्ह्यात जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून, सात लाख ५६ हजार ८०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए.सी बोरकर यांनी दिली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space