नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तळ्याच्या काठी वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी; 11 जण जखमी, 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

तळ्याच्या काठी वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी; 11 जण जखमी, 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : घनंजय गोफने :- तळ्याच्या काठी वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून उचगाव (ता. करवीर) येथे दोन गटांत दगड आणि काठ्यां नी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटांचे दहा जण जखमी झाले.
  • दोन्ही गटांतील १३ जणांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. याबाबत परस्प र विरोधी फिर्याद गांधीनगर पोलिस ठाण्यात दाख ल झाली आहे.
  • मारुती कृष्णा वडर (वय २०, रा आंबेडकर चौक, उचगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उचगाव गाव तळ्याजवळ मारुती आपल्या मित्रांसोबत दिनेश गस्तेचा वाढदिवस साजरा करत होते.
  • त्यावेळी तळ्याजवळ राहणारे मिलिंद महेश पवार सह आठ जणांनी येथे वाढदिवस साजरा करू नका असे दरडावत शिवीगाळ करत काठीने मारहाण केली.
  • त्यामध्ये मारुती कृष्णा वडर, रोहित तिवडे, विश्व नाथ बिरांजे, पप्पू अवघडे, विनोद चौगुले, मनोज चौगुले, (सर्व रा .उचगाव) हे जखमी झाले.
  • याबाबत‌ संशयित आरोपी मिलिंद महेश पवार, शैले श दगडू पवार, सुजय नंदकुमार पोवार, देवा पवार, जयश्री पवार, दिपाली पोवार, अमृता पवार, मयुरी पवार (सर्व रा उचगाव) अशा आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
  • दरम्यान देवांग महेश पवार (रा. साई पंपाच्या मागे उचगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मनोज महे श चौगुले हा आपल्या मित्राचा दहा ते बारा सहका ऱ्यांसमवेत वाढदिवस साजरा करत होता.
  • त्यावेळी दंगा आणि शिवीगाळ सुरू होती. त्यावेळी मिलिंद महेश पोवारने तुम्ही येथे शिवीगाळ करू नका, आमच्या घरी महिला राहतात असे खडसा वले.
  • त्याचा राग मनात धरून मनोज चौगुलेने तुझा काय संबंध असे म्हणत शिवीगाळ करत तो आणि त्याच्या मित्रांनी दगड आणि काठ्यांनी मारहाण केली.
  • त्यामध्ये मिलिंद महेश पवार, अमृता महेश पवार, मयुरी शैलेश पोवार, उमा महेश पोवार, शैलेश दगडू पवार (रा आंबेडकर चौक, उचगाव) जखमी झाले.
  • त्यावरून मनोज महेश चौगुले, मारुती कृष्णात वडर, बबल्या चौगुले, रोहित अशोक तिवडे, विश्व नाथ देवानंद बिरांजे (सर्व रा. आंबेडकर चौक, उचगाव) यांच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा