नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भरधाव बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराला ३० फुटांपर्यंत नेलं फरफटत. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

भरधाव बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराला ३० फुटांपर्यंत नेलं फरफटत.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : समाधान चव्हान :- राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (एसटीने) दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी (ता.८) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील बसस्थान कावर घडली.
  • दरम्यान यावेळी बसचा वेग इतका जास्त होता कि, बस सोबत दुचाकी 30 फुटांपर्यंत फरपटत गेली. या घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी चालका सह वाहकाची जोरदार धुलाई केली.
  • अधिक माहिती अशी कि, मुक्तार रज्जाक शेख (44 रा. खंडाळा) असे या घटनेतील मृताचे नाव आहे.
  • नाशिक – छत्रपती संभाजीनगर बस ही संभाजी नगरकडे भरधाव वेगात जात असताना तालुक्या तील खंडाळा येथील सर्कल मधून मुक्तार शेख यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
  • यावेळी बसने दुचाकीस्वाराला तब्बल 30 फुटां पर्यंत फरपटत नेले. मुक्तार यांच्या डोक्यासह पायाला गंभीर दुखापत झाली.
  • अपघातानंतर त्यांना उपचा्रासाठी वैजापूर येथे दवाखान्यात हलविण्यात आले. यावेळी रस्त्यातच त्यांचा जीव गेला.
  • दरम्यान घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी चालका सह वाहकास मारहाण केली. वैजापूर पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर वातावरण निवळले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा