
अथर्व संगीत विद्यालय येथे गुरु पौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा गुणगौरव.
- प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड : नामदेव मेहेर :- रविवारी दि.१४ रोजी सर्वांगीण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अथर्व संगीत विद्यालय चिखली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त गुणगौरव करण्यात आला.
- गुरुर्ब्रह्म गुरु र्विष्णु गुरु र्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ज्याप्रमाणे गुरूला ब्रह्म विष्णू आणि महेश्वर प्रमाणेच स्थान दिले गेलेले आहे.

- गुरुपौर्णिमा ही महर्षी व्यास ऋषीपासून चालत आलेली परंपरा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूला शिष्याकडून मि ळणारी गुरुदक्षिणा ही परंपरा एकलव्यापासून आहे.
- याचेच औचित साधून अथर्व संगीत विद्यालयांमध्ये शिक्ष कांनाचा मानसन्मान करण्यात आला.

- अथर्व संगीत विद्यालयाचे संचालक डॉ ह.भ.प ज्ञानेश्वर गा डगे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यां ना सांगितले की गुरुला कुठल्याही भेट वस्तूचे किंवा मौ ल्यवान वस्तूची भेट आवश्यक नसून आपला विद्यार्थी शि कून मोठा व्हावा त्याचे नाव व्हावे यातच खरी गुरुदक्षिणा आहे.
- आपल्याला जी कला शिकवली आहे त्यातच विशारद हो ऊन नाव करावे आणि मोठे व्हावे यातच खरा गुरूंचा मान सन्मान असतो.

- तसेच पखावज विशारद अविनाश बोगील सर यांनीही वि द्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी अथर्व संगीत विद्यालयाचे शिक्षक पखवाज विशारद श्री अविनाश भोगील सर गायन विशारद ह.भ.प.श्री.पवन क दम सर संचालक डॉ.ज्ञानेश्वर गाडगे सर प्राचार्य सौ.जय श्री गाडगे मॅडम यांचा विद्यार्थी व पालकांनी गुणगौरव करण्यात आला.

- यावेळी अथर्व संगीत विद्यालयाचे सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











