नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठा आरक्षणासाठी रक्त सांडायलाही मागे सरणार नाही’; युवकानं CM शिंदेंना लिहिलं रक्तानं पत्र. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मराठा आरक्षणासाठी रक्त सांडायलाही मागे सरणार नाही’; युवकानं CM शिंदेंना लिहिलं रक्तानं पत्र.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : हिराजी देसले :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मागील दहा दिवसां पासून आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे.
  • मराठा समाजाच्या मागणी संदर्भात अद्यापपर्यंत समाधानकारक तोडगा निघालेला नाही. मुख्यमं त्र्यांनी या प्रकरणी पुढाकार घेऊन हा प्रश्न निका ली काढावा.
  • मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाण पत्र देऊन मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्यात यावा, अशी मागणी परतूर तालुक्यातील खडकी गावातील युवकाने आपल्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
  • गजानन चवडे असे या युवकाचे नाव आहे. पूर्णतः शेतीवर अवलंबून असलेल्या बहुसंख्य मराठा महा राष्ट्रातील समाजाची स्थिती आज घडीला बिकट आहे.
  • समाजातील अनेक युवक उच्चशिक्षित असून देखील बेरोजगार आहेत. मराठा आणि कुणबी हे एकच असून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
  • स्वत:च्या समाजासाठी आज मराठा युवक जागा झाला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक युवक आपले रक्त सांडायला मागे सरणार नाहीत.
  • सर्व समाजाची भावना लक्षात घेऊन सरकारने मराठा समाजाच्या मागणी चा गांभियाने विचार करावा, असा इशारा चवडे यांनी दिला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा