नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघात आता पाटील विरुद्ध महाडिक लढतीत शिवसेनेच्या क्षीरसागरांची उडी….? – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

कोल्हापूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघात आता पाटील विरुद्ध महाडिक लढतीत शिवसेनेच्या क्षीरसागरांची उडी….?

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : समाधान चव्हान :- राज्यातील बदल त्या राजकीय परिस्थितीमुळे प्रतिष्ठेच्या कोल्हापूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघात आता ‘उत्तरा यण’ दिसू लागले आहे.
  • आमदार सतेज पाटील ते आमदार ऋतुराज पाटील व्हाया माजी आमदार अमल महाडिक असे या मतदारसंघाचे नेतृत्व राहिले आहे.
  • याच मतदार संघावर आता कोल्हापूर उत्तर विधान सभा मतदारसंघातील माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नजर पडली आहे.
  • शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर विधान सभा मतदारसंघात आता कॉंग्रेसचे नेतृत्व आहे.
  • त्या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्यामुळे क्षीरसागर यांना ‘दक्षिणोत्तर’ नजर फिरवावी लागत आहे.
  • राज्यातील मोजक्या मतदारसंघातील लढती चर्चे च्या ठरतात. यापैकी दक्षिण मतदारसंघ एक आहे. याच मतदारसंघात यापूर्वी माजी मंत्री, खासदार, आमदारांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता. त्यामुळे हा मतदारसंघ दीर्घकालीन चर्चेत राहिला.
  • आमदार ऋतुराज पाटील हे ‘उत्तर’मधून लढणार अशी हवा करून ते ‘दक्षिण’ मध्ये फिरले. तेथून विजयीही झाले.
  • पुढे महाविकास आघाडी झाली आणि कट्टर शिव सैनिक असलेले क्षीरसागर यांना पोटनिवडणुकीत उत्तरमध्ये कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांचा प्रचार करावा लागला. त्यामुळे उत्तर मतदारसंघही आता त्यांचा राहिलेला नाही.
  • राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली. त्याचे पडसाद आता दक्षिण आणि उत्तरमध्ये दिसू लागले.
  • ‘उत्तर’साठी नेहमीच शड्डू ठोकून आखाड्यात उतर ण्याच्या तयारीत असलेल्या क्षीरसागर यांचा मतदारसंघ भाजपच्या वाटणीला येण्याची शक्यता आहे.
  • विशेष म्हणजे येथे त्यांचा उमेदवार यापूर्वी होता. त्यामुळे क्षीरसागर यांनी महापालिका हद्दीतील पण ‘दक्षिण’ मध्ये असलेल्या प्रभागात अधिक निधी दिला आहे.
  • आपला प्रभाव तेथे दाखवायला सुरुवात केली आहे प्रसंगी ‘दक्षिण’ मधून शिंदे गटाकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. याचवेळी ‘उत्तर’ ही हातून निसटू नये म्हणून आता ‘दक्षिणो त्तर’ असा प्रवास सुरू केला आहे.
  • खासदार महाडिक यांचे सूचक वक्तव्य
  • खासदार धनंजय महाडिक यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार अमल महाडिकच असतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यामुळे ‘दक्षिणे’त आता ‘उत्तरायण’ सुरू झाले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा