नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राजकीय वर्तुळात खळबळ….! संतप्त पदाधिकाऱ्यांनी BJP कार्यालयच केलं बंद. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

राजकीय वर्तुळात खळबळ….! संतप्त पदाधिकाऱ्यांनी BJP कार्यालयच केलं बंद.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : संदीप कारके :- जिल्ह्यातील नेतेमंड ळींनी केलेल्या खांदेपालटावर आजरा तालुक्यात भारतीय जनता पक्षामध्ये जुन्या व नव्या पदाधिका ऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
  • अनेक वर्षांपासून पक्षात सुरु असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करीत जिल्हा पातळीवरील नेत्यांना टार्गेट केले.
  • आजऱ्यातील भाजपचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील नेतेमंडळींकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करीत कार्या लयाचा फलक उतरवला.
  • यामुळे पक्षात दुफळी पडल्याचे स्पष्ट झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तालुका पातळीवरील पदाधिकारी बदलासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु होत्या.
  • खांदेपालट कसा होणार यावर भाजपमध्ये उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळींनी खांदेपालट केली. याचे पडसाद दोन दिवसांत तालुक्यात उमटले आहेत.
  • याबाबत गुरुवारी (ता. ७) पक्षातील जुन्या पदाधि काऱ्यांनी बैठक घेतली व नेतेमंडळींच्या निर्णया बाबत नाराजी व्यक्त केली.
  • स्थानिक जुन्या जाणत्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची मते विचारात न घेता बदल केल्याचा आरोप त्यांनी केला.
  • बदलामध्ये जुन्या निष्ठावंत कार्यक र्त्यांना डावल ल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. जुने पदा धिकारी आज आजरा -गडहिंग्लज मार्गावरील भाज पच्या तालुका कार्यालयात जमले.
  • त्यांनी भाजपच्या कार्यालयाचा नामफलक उतरव ला. कार्यालय बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. लवकरच याबाबत मेळावा घेऊन पुढील दिशा ठरव णार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
  • यावेळी प्रा. सुधीर मुंज, अरुण देसाई, नाथा देसाई, सचिन इंदलकर, महेश नार्वेकर, हर्षद परुळेकर भा स्कर बुरुड, गुरु टोपले, अभिजित रांगणेकर, संज य सांबरेकर, मारुती गुरव यांच्यासह शहर व तालु क्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा