
पुणे येथे रेल्वे प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मांडले प्रमुख मुद्दे.
- प्रतिनिधी : शकील मुलाणी : माळशिरस :- पुणे आणि सोलापूर विभागातील रेल्वे संबंधित प्रश्नांवर मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे बैठक पार पडली.

- या बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आप ल्या मतदारसंघातील रेल्वे विकासाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

- खासदार मोहिते-पाटील यांनी पंढरपूर-फलटण रेल्वेमार्गा च्या प्रगतीबाबत विचारणा केली. तसेच, पंढरपूर-देहू मेमू रेल्वे आणि दौंड-कुलबर्गी-दौंड दैनंदिन रेल्वे सुरू करण्या ची मागणी केली.
- जेऊर-आष्टी रेल्वेमार्गाच्या कामकाजाचा आढावा घेण्या सोबतच कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉपच्या क्षमता वाढवण्याची मागणीही त्यांनी केली.

- याशिवाय, सांगोला-दानापूर किसान रेल्वे, मोडनिंब कार्गो टर्मिनल उभारणी आणि कुर्डूवाडी येथील रेल्वे पोलीस ट्रे निंग सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी जोरकस पणे मांडली.

- या बैठकीस खा.सुप्रियाताई सुळे, खा.ओमराजे निंबाळक र, खा.निलेश लंके, खा.अमोल कोल्हे, खा.श्रीरंग बारणे, खा.भाऊसाहेब वाकचौरे, खा.मेधाताई कुलकर्णी, खा. वि शाल पाटील, खा. रजनीताई पाटील, खा. नितीन पाटील, खा. शिवाजी काळूंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











