
शेत रस्त्यावर काटे टाकण्याच्या वादातून कुऱ्हाडीच्या मुदनने हल्ला; हल्ल्यात शेतकरी ठार.
- प्रतिनिधी : सचिन कोयर : यवतमाळ :- वडगाव जंगल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजा आकपुरी शेत शिवारात एका क्षुल्लक वादातून एक शेतकरी गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक १४ जून रोजी घडली.
- आकपुरी शेत शिवारात गट क्रमांक ४६ व ४७ दरम्यानच्या असलेल्या शेत रस्त्यावर काटे टाकल्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद उफाळून आला,आणि या वादाचे परिणाम थेट रक्तरंजित हल्ल्यात झाले.
- सुधाकर महादेव बोटरे (वय ४५,रा.धानोरा) असे हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव असून,आरोपी रमेश शाम राव कुळसंगे (वय ४०, रा.गणेशपूर) याने अचानक रागा च्या भरात हातातील कुऱ्हाडीच्या लोखंडी मुदनने मृतक सुधाकर बोटरे यांच्यावर जबर हल्ला करत मारहाण केली.
- या मारहाणीत ते गंभीर जखमी होऊन मृत पावले. ही वा र्ता गावात पसरताच नातेवाईकांनी आकपुरी शेत शिवारा त धाव घेत बोटरे यांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल केले.
- मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतक सुधाकर बोटरे यांना आधीच एक वर्षापूर्वी पॅरॅलिसिस झाला होता.
- वडगाव जंगल ठाण्याचे ठाणेदार विकास दांडे,पीएसआय भाऊराव बोकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल अविनाश खाडे हे तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी रमेश कुळसंगे याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल कर ण्याची प्रक्रिया सुरू आहे.अधिक तपास पो.स्टे. वडगाव जंगल करीत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/