नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मनोज जरांग पाटील यांच्या उपोषणाचा 14 वा दिवसः आज सर्वपक्षीय बैठक; मराठा आरक्षणाचा पेच सुटणार का…? – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मनोज जरांग पाटील यांच्या उपोषणाचा 14 वा दिवसः आज सर्वपक्षीय बैठक; मराठा आरक्षणाचा पेच सुटणार का…?

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : संदीप कारके :- जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षणासाठी उपोषण सूरू करण्यात आले आहे.
  • आज या उपोषणाचा 14 वा दिवस आहे. राज्य सरकारने आतापर्यंत अनेकदा हे उपोषण सोडण्या साठी प्रयत्न केले आहे.
  • मात्र,राज्य सरकारचे सर्व प्रयत्न फेल ठरले आहेत. सरसकट आरक्षणाच्या आपल्या निर्णयावर मनोज जरांगे ठाम आहेत.
  • राज्य सरकारच्या वतीने सातत्याने मनोज जरांगे यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांच्या माग ण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे.
  • यात आता मनोज जरांगे यांनी पाणी आणि औषधां ही त्याग केला आहे. तसेच त्यांनी सलाईनही काढले आहे.
  • या सर्व पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक बोलाव ण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाचा पेच सुट णार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
  • मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौदावा दिवस आहे. एक सप्टेंबरला या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
  • पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली होती. त्यात आता आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.
  • त्यामुळे जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्या साठी राज्य शासनाने आतापर्यंत तीन वेळा चर्चा केली आहे.
  • मात्र, त्यातून कोणताच तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने दोन अध्यादेश देखील काढले आहे त. तरी देखील मनोज जरांगे सरसकट आरक्षणा च्या मुद्यावर ठाम आहेत.
  • पाणी-उपचार बंद
  • अनेक चर्चेच्या फेऱ्या करुन देखील राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आढी अद्या प सुटलेली नाही.
  • या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला चार दिवसांचा अवधी संपला आहे.
  • त्यामुळे त्यांनी पाणी पिणे आणि उपचार घेणे बंद केले आहेत. राज्य शासनाने दोन अध्यादेश काढले. परंतु, ते मान्य नसल्याने परत पाठवले आहेत.
  • एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक मराठा आरक्ष णाबाबत तोडगा काढण्यासाठी सोमवारी सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख आणि प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे.
  • ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात दिली.
  • आरक्षणाच्या मुद्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे आक्रमक होताना पाहावयास मिळत आहेत.
  • त्यांनी पाणी न घेणे आणि उपचारासाठी नकार दिल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. जरांगे यांच्या या निर्णयामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा