नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चांदवड देवळा तालुक्यातील पोलीस पाटील आरक्षण सोडत जाहीर. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

चांदवड देवळा तालुक्यातील पोलीस पाटील आरक्षण सोडत जाहीर.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ (आर के मामा):- चांदवड देवळा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांनी चांदवड देवळा तहसील दार यांचे सहकार्याने तालुक्यातील राजकीय नेते पुढारी व सर्वसामान्य नागरिक यांच्या उपस्थित पोलीस पाटील आरक्षण सोडत कार्यक्रम तहसील कार्यालय नवीन इमारत चांदवड येथील नियोजित ठिकाणी, वेळी व्यवस्थित आयोजन केले.
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण काढताना चांदवड व देवळा तालुक्यात एकूण ५९ जागा रिक्त होत्या सदर जागेचे आरक्षण काढताना कोणीही लेखी स्वरुपात हरकती दर्शविल्या नाहीत.
  • मात्र भाटगाव,कुंडाणे,निंबाळे यासारख्या गावातील पूर्वीचे आरक्षण होते तेच आरक्षण कसे निघाले याबाबत तसेच लोकसंख्येवर आधारित, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या बाबतीत किरकोळ स्वरूपा चे प्रश्नावली उपस्थित करून काही नागरिकांनी शंका निर्माण केल्या.
  • त्यावर सोडत कार्यक्रम आयोजित प्रांत अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी शंकांचे निरसन करून कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.
  • पोलीस पाटील जागेचे आरक्षण कार्यक्रम पार पडल्यानंतर उपस्थित नागरिकांमध्ये काही जागां च्या बाबतीत पूर्वीचे जे आरक्षण होते तेच आरक्षण कसे निघाले याबाबत शंका निर्माण झाल्याने हर कती दाखल कराव्यात याकरिता काही नागरिकांचे चर्चेचे सूर बाहेर निघाले.
  • तरी पोलीस पाटील आरक्षणाबाबत सोडत कार्य क्रम पार पडल्यानंतर पुढील काही दिवसात हरकती दाखल होणार किंवा काय…?
  • याबाबत नागरिकांमधील चर्चेचा सूर निघत अस ल्याने पुन्हा नव्याने आरक्षण सोडत निघेल की आज आरक्षण सोडत कार्यक्रमाप्रमाणे निश्चित केलेले आरक्षणा नुसारच पोलीस पाटील जागेची भरती केली जाईल हे गुढ निर्माण झालेले आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा