नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘दीड वर्ष आम्ही मशागत केली आणि वीस दिवसांत धैर्यशील माने खासदार झाले, आता त्यांनी पैरा फेडावा’ – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

‘दीड वर्ष आम्ही मशागत केली आणि वीस दिवसांत धैर्यशील माने खासदार झाले, आता त्यांनी पैरा फेडावा’

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : संदीप कारके :- हातकणंगले लोक सभा मतदारसंघात दीड वर्ष आम्ही मशागत केली आणि वीस दिवसांत धैर्यशील माने खासदार झाले.
  • आता माने यांनी आमचा पैरा फेडण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत आपला प्रचार करावा,असे आवा हन माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.
  • शासकीय विश्रामगृहात खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाने केलेल्या झोन बंदी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते.
  • काही साखर कारखानदारांनी साखर महासंघा मार्फत सरकारला झोन बंदी करण्याची विनंती केली होती.
  • त्याला राज्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे एका रात्री झोन बंदीची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असेही खोत यांनी सांगितले.
  • झोन बंदी तत्काळ उठवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शरद पवार बडे मिया आणि रोहित पवार छोटे मिया आहेत.
  • रोहित यांनी साखर कारखान्यांमधील हवाई अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले.
  • मतदारसंघात दीड वर्ष लोकांशी संपर्क ठेवला. लोकांचे प्रश्‍न सोडवले. त्यानंतर धैर्यशील माने यांच्या प्रचाराची धुरा आपल्यावर सोपवली. ही धुरा यशस्वीरित्या पार पाडली.
  • आता २०२४ मध्ये याच मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे माने यांनी २०१९ चा पैरा फेडण्यासाठी माझा प्रचार करावा, असे आवाहन खोत यांनी केले.
  • ‘मला लढायला शिकवू नका’
  • राजू शेट्टी यांचा कार्यकर्ता मला कोल्हापुरात फिरू देणार नाही म्हणतो. मी मराठा आहे. मला लढाय ला शिकवू नका. इशारा दिलेल्या कार्यकर्त्याला विधानसभेची निवडणूक लढवताना पाय थरथरत होते.
  • माझ्यामुळेच अनेक ठिकाणी त्यांना प्रचार करता आला. आम्ही तलवारी घेऊन लढणारे कार्यकर्ते आहोत.
  • त्यामुळे तलवारी गुंडाळून ठेवणाऱ्यांनी कोल्हापुरात फिरू देणार नसल्याची भाषा बोलू नये, अशी टीका सावकार मादनाईक यांचे नाव न घेता केली.
  • ‘त्यांच्या’ आंदोलनाचा दिखावा सर्वांना माहिती’
  • लोकसभा निवडणूक आली आहे. काहीजण (राजू शेट्टी यांचे नाव न घेता) ऊस दराचे आंदोलन करती ल. त्यांनी एक दर मागायचा, त्यानंतर कारखान्यां सोबत चर्चा आणि त्यातून एक दर निघतो.
  • त्यामध्ये पहिला हप्ता एवढा, दुसरा एवढा आणि तिसरा किती याची ठरवून चर्चा होते; मात्र पहिल्या नंतर दुसरा आणि तिसऱ्याबाबत चर्चाच होत नाही.
  • त्यामुळे त्यांच्या अशा आंदोलनाचा दिखावा सर्वांना माहिती असल्याची टीकाही खोत यांनी केली.
  • ‘राजू शेट्टी हे कार्यकर्त्यांना कुजवणारे नेते’
  • नेतृत्व करणाऱ्यांकडे,दातृत्व,मातृत्व आणि पितृत्वा चे गुण असावे लागतात. पण, राजू शेट्टी कार्यक र्त्यांना कुजवणारा नेते आहेत.
  • दरम्यान, रवी तुपकर यांच्यावर कारवाई करताना जालिंदर पाटील यांनी माघार का घेतली असा टोलाही खोत यांनी लगावला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा