नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात काँटे की टक्कर होईल. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात काँटे की टक्कर होईल.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : माधवी चंदरकी :- हातकणंगले लोक सभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात काँटे की टक्कर होईल.
  • अशी चर्चा सुरू असतानाच भाजपचाच किंवा राज्य सरकारचा घटक पक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही यामध्ये उडी घेतली आहे.
  • त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच लोकसभेचा हातकणंगले मतदारसंघ आरोप-प्रत्यारोपाने गाज णार आहे. २०१९ मधील निवडणुकीसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार तयारी केली होती.
  • दीड ते दोन वर्षं मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यानंतर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली होती.
  • माने विजयी होण्यामागे भाजपची शक्ती आणि खोत यांच्या प्रचार सभांचाही समावेश होता.
  • दरम्यान,माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यां च्या गेल्या गळीत हंगामातील प्रतिटन ४०० रुपये दराच्या मागणीसाठी काढलेल्या धडक मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
  • ऊस टंचाईमुळे यंदाच्या गळीत हंगामात किती दर असावा याबद्दल जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेतली जाणार आहे. शेतकरी, मतदारांच्या प्रश्‍‍नां कडे लक्ष वेधण्यासाठी शेट्टी मैदानात उतरले आहेत.
  • माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही जिल्ह्यात विवि ध दौरे सुरू केले आहेत. उसाला जादा दर मिळावा, साखर कारखान्यांची झोनबंदी उठवावी, मराठा ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे, चर्चेचे आणि महत्त्वाचे मुद्दे घेवून खोत आणि शेट्टी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आहेत.
  • माने संसदेत याच सर्व प्रश्‍नांवर केंद्र सरकारने गांभभीर्याने विचार करावा, अशी मागणी करत आहेत.
  • राजू शेट्टींविरोधात उभारणार कोण…?
  • खासदार माने आणि सदाभाऊ खोत हे सत्तेतील घटक पक्षात आहेत. खोत स्वतंत्र असले तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली च त्यांचे काम सुरू आहे.
  • राजू शेट्टींविरूद्ध माने की खोत हे भविष्यात ठरेल. त्याआधी मात्र दोन्ही नेत्यांनी आपआपल्या पातळीवर लोकसभेची तयारी सुरू केली आहे.
  • प्रमुख इच्छुक उमेदवार
  • धैर्यशील माने
  • सकारात्मक बाजू
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते
  • संसदेत विविध प्रश्‍न उपस्थित
  • माजी खासदार निवेदिता माने यांचे पाठबळ
  • नकारात्मक बाजू
  • ठाकरे गटातून फुटल्याने कार्यकर्ते नाराज
  • सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोचता आले नाही
  • मतदारसंघातील विकासाबाबत प्रश्‍नचिन्ह
  • राजू शेट्टी
  • सकारात्मक बाजू
  • सध्या तरी अपक्ष
  • शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लढा देणारे नेते
  • कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत चांगले संघटन
  • नकारात्मक बाजू
  • सर्व पक्षांसोबत संधान बांधण्याचा प्रयत्न
  • तीव्र आंदोलनाचे हत्यार शिथिल
  • ज्यांना विरोध केला, त्यांच्यासोबतच संधान
  • सदाभाऊ खोत
  • सकारात्मक बाजू
  • सध्या स्वतंत्र; पण भाजपचे पाठबळ
  • शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लढा देणारे नेते
  • कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत चांगले संघटन
  • नकारात्मक बाजू
  • सत्तेत असताना साखर कारखान्यांचे हवाई अंतर कमी केले नाही
  • कडकनाथ प्रकरणात बॅकफूटवर
  • काही ठिकाणी सोयीची भूमिका
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा