नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अंकोली ता मोहोळ येथील शेतकरी कुटुंबातील विद्या सिताराम गायकवाड ही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

अंकोली ता मोहोळ येथील शेतकरी कुटुंबातील विद्या सिताराम गायकवाड ही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : शकील मुलानी :- वेगवेगळ्या प्रकार च्या तीन वेळा परीक्षा दिल्या, मात्र नशिबाने जवळ येऊन हुलकावणी दिली. तरी ही नाराज न होता मनात जिद्द बाळगून अखेर चौथ्या टप्प्यात यशाला गवसणी घातलीच.
  • अंकोली ता मोहोळ येथील शेतकरी कुटुंबातील विद्या सिताराम गायकवाड ही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन “वनपरिक्षेत्र अधिकारी” पदी महाराष्ट्रातून अकराव्या क्रमांकाने तिची निवड झाली.
  • तिची ही यशोगाथा. मात्र यशासाठी आई वडिलां सह कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रेरणा होतीच, पण त्याहीपेक्षा जादा प्रेरणा व प्रोत्साहन चौथ्या टप्प्या पर्यंत मार्गदर्शन केलेल्या प्रत्येक शिक्षकांची मिळा ली हे विद्याने आवर्जून सांगितले.
  • या संदर्भात माहिती देताना विद्या गायकवाड म्हणाली, मला लहान पणापासूनच प्रशासनातील अधिकारी होण्याची इच्छा होती.
  • मग ते क्षेत्र कुठलेही असो. त्याला कारण ही तसेच होते. घरातील भाऊ व बहीण प्रशासनात चांगल्या हुद्द्यावर नोकरीस आहेत.
  • विद्या चे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या व महाविद्यालयात झाले. तर बारावीचे शिक्षण सोलापूर येथील जोशी महाविद्यालयात झाले.
  • बीएससी ऍग्री ही कृषी क्षेत्रातील पदवी कृषी महाविद्यालय पुणे येथून प्राप्त केली. 17 डिसेंबर 2022 रोजी राजपत्रित तांत्रीकसेवा संयुक्त पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर महाराष्ट्र वनसेवेची परीक्षा ही दिली.
  • त्यानंतरचा टप्पा म्हणजे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा.ती एप्रिल 2023 मध्ये दिली.18 डिसेंबर ला निकाल झाला, मी महाराष्ट्रातून अकराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे समजल्यावर आनंदाला पारावर उरला नाही. घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याची भावना झाली.
  • आई-वडील शेती करतात, तर वडील शेती बघत छोटे मोठे बांधकामाचे ठेके घेतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या अडचणीची मला जाण आहे, मी ग्रामीण भागातीलच आहे.
  • त्यामुळे प्रशासनात चांगला अधिकारी म्हणून सर्व सामान्याला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार असल्या चे विद्या गायकवाड हिने सांगितले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा