नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सांगोला तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीबाबत अनेक कमेंट,व्हिडिओ व्हायरल; कार्यक्रम तर करेक्ट होणार..! मात्र कोणाचा…? याबाबत चर्चाना उदान. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

सांगोला तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीबाबत अनेक कमेंट,व्हिडिओ व्हायरल; कार्यक्रम तर करेक्ट होणार..! मात्र कोणाचा…? याबाबत चर्चाना उदान.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : धनंजय गोफने :- आगामी निवडणु कीचे वारे सोशल मीडियावर जोरात वाहू लागली आहे. ठीक ठिकाणच्या बैठकातून निवडणुकांच्या चर्चेबरोबरच फेसबुक, व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
  • सांगोला तालुक्यातील सध्या विधानसभेच्या निवड णुकीबाबतही अनेक कमेंट, व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्येच ‘कार्यक्रम तर करेक्ट होणार!’ मात्र कोणाचा ? याबाबत चर्चाना उदान येत आहे.
  • सांगोला तालुका हा राजकीय दृष्ट्या तसा कित्येक वर्षापासून शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळख ला जात होता.
  • मात्र 2019 च्या निवडणुकीची वेळी अल्पमतात का होईना शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील विज य तर झालेच परंतु गुवाहाटीमधील त्यांच्या ‘काय झाडी, काय डोंगार..’ या वाक्यामुळे सर्वत्र प्रसिद्धही झाले.
  • सध्या तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात आणला गेलेला निधी, या निधीतून सुरू असणारे विविध कामे, टेंभू, म्हैसाळ, उजनी व निरा उजवा कालव्या तून मिळालेले पाणी यावर राजकीय भांडवल मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
  • सांगोला तालुका म्हणलं की सर्व निवडणुका ह्या पाण्याभोवतीच फिरत होत्या. आजही पाण्याच्या बाबतीतही अशीच परिस्थिती कायम असल्याचे सोशल मीडियाच्या प्रतिक्रियावरून दिसून येत आहे.
  • तालुक्यात येणारे निधी असो, पाणी असो किंवा इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सोशल मीडियाद्वारे विवि ध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेतेमंडळी चर्चा करीत असतात.
  • गेल्या पन्नास वर्षाचा व सध्या पाच वर्षाचे तुलना या प्रतिक्रियातून दिसून येते. यामध्ये अनेक बाबतीत सकारात्मकतेच्या व नकारात्मकतेच्या दृष्टीनेही चर्चा होते.
  • राजकीय कार्यकर्ते आपापल्या परीने दोन्ही बाबतीत ही चर्चा करताना ‘कार्यक्रम तर करेक्ट होणार !’ अशीच भाषा बोलत आहे.
  • परंतु कार्यक्रम नक्की कोणाचा होणार याबाबत स्पष्टपणे बोलत नसल्याने नक्की कार्यक्रम कोणाचा होणार याबाबत चर्चेला उदान येत आहे.
  • दीपक आबाही ठोकणार शड्डू…?
  • सांगोला तालुक्याचे राजकारण हे पक्षनिष्ठेपेक्षा सध्या व्यक्तिनिष्ठतेवर जास्त अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी व त्यानंतर आमदार शहाजी पाटील यांच्या बरोबरीने प्रत्येक कार्यक्रमात,निवडणुकांत बरोबरीने असणा रे दीपक साळुंखे पाटील हेही विधानसभेच्या दृष्टीने विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
  • साळुंखे-पाटील आखाड्यात उतरून शड्डू ठोकत असले तरी विधानसभा निवडणुकीची खरी कुस्ती धरणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
  • यावेळी आबा कार्यकर्त्यांना कामाला लागा असा संदेश देताना दिसत असून कार्यकर्तेही सोशल मीडियातून आबांना ‘भावी आमदार’ असे संबोधित आहेत.
  • शेकापमधील वाद चव्हाटय़ावर –
  • 2019 ची विधानसभा लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख हे पुढील शिक्षणासाठी मतदारसंघापासून दूर राहिले याच कालावधीत डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आपले शिक्षण व डॉक्टरकी सोडून पक्षा साठी वेळ दिला.
  • गावोगावी जाऊन त्यांनी पक्षातील कार्यक्रमांना व कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन अडचणी जाणून घेऊ लागले.
  • डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षातील स्व. गणपतराव देशमुख यांच्या बरोबरीने काम केलेले अनेकजण काही कारणास्तव नाराजही झाले.
  • या नाराजी नाट्यातून त्यांनी वेगळी बैठकही घेतली. सध्या 2024 च्या आगामी विधानसभा निवडणुकीतील दोन नातूमध्ये उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होत असतानाच पक्षामधील नाराजी नाट्यही समोर येऊ लागले आहे.
  • परंतु पक्षातील वाढते प्रस्त,त्यांचा वाढता जन संपर्क यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख हे विधान सभेची निवडणूक नक्की लढतील हे सध्या तरी दिसून येत आहे.
  • नाराजांची नाराजी आमदार बापू दूर करणार का ?
  • आमदार शहाजी (बापू) पाटील हे आपल्या कार्य कर्त्यांच्या फळीमुळेच अनेक वर्ष विविध निवडणू का शेकापविरोधात लढत राहिले.
  • 2019 ची निवडणूक बापू विजयी झाले, त्यांना मोठी प्रसिद्धीही मिळाली. राजकीय परिस्थितीमुळे बापूंचे स्थानही वाढले.
  • अशा राजकीय परिस्थितीत तालुक्याच्या विकास कामांसाठी मोठा निधीही मिळू लागला. गेल्या कित्येक वर्षापासून बापूंजवळ राहिलेले अनेक कार्यकर्ते काही कारणामुळे बापुंपासून दुरावू लागले.
  • या नाराज कार्यकर्त्यांचा फटका आगामी निवडणु का होऊ नये म्हणून आपल्या कट्टर नाराज कार्यक र्त्यांची नाराजी दूर करणार का याकडे लक्ष लागले आहे.
  • सत्ता असतानाही कार्यकर्ते का दुरावू लागले याचा शोध काही बापूंजवळील नेतेमंडळी सध्या घेऊ लागले आहेत.
  • मोदींची लाट, भाजप सुसाट
  • सांगोल्यात शेकापचे देशमुख घराणे, आमदार शहा जी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्याभोवती सांगोल्याचे राजकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे.
  • गेल्या काही वर्षापासून देशात सुरू असणारे मोदीं च्या लाटेमुळे भाजपच्या पक्षांतर्गत नवनवीन विविध उपक्रमामुळे, त्यांच्या स्वतःच्या पक्षातील होणाऱ्या कार्यक्रमांमुळे तालुक्यात भाजपची लाट सध्या सुसाट असल्याचे दिसून येत आहे.
  • तालुकाध्यक्षपदावरून थेट ग्रामीण जिल्हाध्यक्ष झालेले चेतनसिंह केदार-सावंत हे विधानसभेच्या पक्षीय राजकारणापासून दूर असले तरी पक्षवाढी साठी, पक्ष कार्यक्रमांनाच सध्यातरी ते प्राधान्यक्रम देताना दिसून येत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा