नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , १५ वर्षीय विद्यार्थिनीला नोट्स देतो म्हणत शिक्षकाने वर्गात नेले. त्यानंतर दरवाजा बंद करून तिच्याशी अश्लील चाळे करत विनयभंग केला. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

१५ वर्षीय विद्यार्थिनीला नोट्स देतो म्हणत शिक्षकाने वर्गात नेले. त्यानंतर दरवाजा बंद करून तिच्याशी अश्लील चाळे करत विनयभंग केला.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : संदीप कारके :- खासगी शिकवणीचा क्लास संपल्यानंतर घरी निघालेल्या १५ वर्षीय विद्यार्थिनीला नोट्स देतो म्हणत शिक्षकाने वर्गात नेले.
  • त्यानंतर दरवाजा बंद करून तिच्याशी अश्लील चाळे करत विनयभंग केला. विशेष म्हणजे तिने ‘सर असं काय करताय, असं करू नका’ अशी विनवणी केल्यानंतरही त्याने ‘शांत बस नाहीतर तुला मारून टाकीन’ असे धमकावले.
  • याप्रकरणी ‘त्या’ शिक्षकाविरोधात पुंडलिकनगर पोलिसांत गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राजेश कैलास शिंगारे (रा. गजान ननगर, गल्ली क्र. ७) असे शिक्षकाचे नाव आहे.
  • याप्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती दहावीत शिकते.
  • १९ सप्टेंबर रोजी ती सकाळी साडेनऊदरम्यान इतर दोन मैत्रिणींसोबत गजानननगरातील गल्ली क्र. एकमध्ये असलेल्या एक्सलन्स ॲकॅडमी (ॲबॅकस क्लास) येथे शिकवणीसाठी गेली होती.
  • सुरवातीला एका महिला शिक्षिकेचा वर्ग झाल्या नंतर विज्ञान विषय शिकवणारा शिक्षक राजेश शिंगारे याला पीडितेने विज्ञानच्या नोट्स मागितल्या असता, चल तुला नोट्स देतो म्हणत शिक्षकाने तिला वर्गात नेले.
  • विद्यार्थिनी करत होती विनवणी
  • विद्यार्थिनीला वर्गात नेताच शिक्षक राजेशने दरवा जा बंद केला. त्यावर तिने दरवाजा बंद का केला असे विचारताच शिक्षकाने शांत बस नाहीतर तुला मारून टाकीन असे म्हणताच ती शांत बसली.
  • मात्र, त्याने तिला जवळ ओढत तिच्याशी अश्लील चाळे केले.त्यावर विद्यार्थिनीने विनंती केली असता, शिक्षकाने तिला ठार मारण्याची धमकी देत अश्ली ल चाळे करण्याचा प्रकार चालूच ठेवला.
  • विद्यार्थिनीने त्याला ढकलून स्वतःची सुटका करून घेत पळ काढला आणि थेट मैत्रिणीला सांगितले.
  • दरम्यान, तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला तत्काळ बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याची तुरूंगात रवानगी केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा