नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , छत्रपती संभाजीनगर पोलिस सणासुदीच्या काळात, मोर्चा, आंदोलने हाताळताना ड्रोनचा वापर करणार. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

छत्रपती संभाजीनगर पोलिस सणासुदीच्या काळात, मोर्चा, आंदोलने हाताळताना ड्रोनचा वापर करणार.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : माधवी चंदरकी :- स्मार्ट सिटीच्या एकात्मिक सुरक्षा आणि सिटी ऑपरेशन्स प्लॅट फॉर्म प्रकल्पाअंतर्गत पाच ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत.
  • यातील तीन ड्रोन महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांना सुपूर्द केले.
  • सणासुदी च्या काळात,मोर्चा,आंदोलने हाताळताना पोलिस या ड्रोनचा वापर करणार आहेत.
  • स्मार्ट सिटी अभिनाअंतर्गत शहरात ७०० सीसीटी व्ही बसविण्यात आले असून, शहरातील सर्व पोलिस ठाणे या कॅमेऱ्यांसोबत जोडले आहेत. पोलिस आयुक्तालयात कंट्रोल ॲण्ड कमांड रूम आहे.
  • एकात्मिक सुरक्षा व सिटी ऑपरेशन्स प्लॅटफॉर्म प्रकल्प राबविण्यात आला. त्यात पाच ड्रोन खरेदी करण्यात आले.
  • त्यातील तीन ड्रोन पोलिसांना गुरुवारी (ता. २१) सुपूर्द करण्यात आले.
  • सिटी चौक, जिन्सी, क्रांती चौक या तीन पोलिस ठाण्यांना ड्रोन देण्यात आले. त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ड्रोन उड्डाण प्रशिक्षण आयोजित केले आहे.
  • दरम्यान, या ड्रोनची त्यांच्या बेस स्टेशनपासून दोन किलोमीटरची प्रभावी ऑपरेशनल रेंज आहे आणि प्रत्येक फ्लाइटमध्ये अंदाजे ३० मिनिटे हवेत राहू शकतात. या ड्रोनचे वैशिष्ट्य म्हणजे रीअलटाइम लाइव्ह व्हिडिओ करण्याची त्यांची क्षमता आहे.
  • या कार्यक्रमाला पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, पोलिस निरिक्षक प्रविणा यादव, निर्मला परदेशी, रमेश्वर रेंगे, संतोष पाटील, स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली यांची उपस्थिती होती.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा