
वरझडी येथे सरोजनीबाई लोणकर विद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे : यवतमाळ :- सरोजनीबाई लोणकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री आ. वसंतरावजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
- या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहायक शिक्षक न.वा. राठो ड होते.प्रमुख पाहुणे म्हणून खूनकर सर,बानकर सर,आडे सर, शिंदे मॅडम,तिमसे सर तसेच रेशमा राठोड मॅडम उपस्थित होते.
- कार्यक्रमात वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याचा आणि शेती सुधारणा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
- जयंतीचे औचित्य साधून विद्यालय परिसरात पिंपळाच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्य मातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
- कार्यक्रमाचे संचालन कल्याणी ताजणे या विद्यार्थीनीने केले तर भूमेष चव्हाण व धनश्री नेवारे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे मन जिंकले.
- यावेळी अरुण राऊत,राजू लांडगे,राकेश डफळे,राहुल रत्न पारखी यांच्यासह इतर विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शि क्षक व शिक्षके त्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/