प्रेमाच्या आमिषाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार; गर्भवती ठरल्यानंतर उघड, युवकावर गुन्हा दाखल.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे : यवतमाळ :- तालुक्यातील वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गा वात अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकी स आली आहे.
  • विजय रामदास आत्राम (वय २२) रा. येळाबारा असे आ रोपीचे नाव असून त्याच्यावर पोस्को कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही बारावीत शि कत असून, ती आपल्या आई व कुटुंबासोबत राहत आहे. दोन वर्षांपूर्वी तिची आरोपी विजय आत्राम याच्याशी ओ ळख झाली होती.
  • काही महिन्यांतच त्याने ‘प्रेम करतो’ असे सांगत तिला भा वनिक जाळ्यात अडकवले. “तू मोठी झाल्यावर लग्न करी न” अशा प्रकारच्या आश्वासनांनी त्याने तिच्यावर वारंवार दबाव टाकला.
  • एकदा नदीकाठी बोलावून त्याने तिच्यावर जबरदस्ती के ली. त्यानंतर घरी कोणी नसताना, एकांतस्थळी, वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करत राहिला.
  • पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, गेल्या वर्षभरात वारंवार असे अत्याचार घडले. फेब्रुवारी २०२५ मध्ये मासिक पा ळी आल्यानंतर ती बंद झाली. तब्येतीत बिघाड जाणवू लागल्यानंतर तिने आईला माहिती दिली.
  • त्यानंतर तिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, जिथे ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. सध्या ती रुग्णालयात उपचार घेत आहे.
  • या संपूर्ण प्रकारानंतर पीडितेच्या आई व आजी समक्ष ज बाबावरून वडगाव जंगल पोलिसांनी आरोपी विजय राम दास आत्राम याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वडगाव जंगल पोलिस स्टेशनचे सपोनि विकास दांडे करीत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles