
वीरशैव कक्कया ढोर समाजाचे दि. ७ जुलै रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- चलो आझाद मैदान, उठ कक्कया जागा हो, महामंडळाचा धागा हो….! वीरशैव कक्कया ढोर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या च्या हक्काचे आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्या साठी तळागातील ढोर (कक्कया ) बांधवाना आता एक जूट दाखवण्याची वेळ आली आहे.
- आपला समाज आजवर अनेक पक्षाचा दावणीला बांधला गेला.त्यांनी आपला स्वार्थ साधून घेतला.पण समाज मात्र मागे राहिला.
- या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी, येणाऱ्या भावी पि ढीचे भविष्य घडविण्यासाठी,आपापसातील मतभेद बाजू ला सारून पावसाळी अधिवेशनात सरकारला घेराव घाल ण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे.
- गेल्या वर्षी २८जूनला संत कक्कया स्वतंत्र आर्थिक विका स महामंडळाच्या मागणीसाठी आझाद मैदानात हजारो बांधवाच्या साक्षीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते.
- याची दखल घेऊन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत कक्कय्या समाजाला महामंडळ दिले जाण्याची घोषणा केली.
- परंतु ती घोषणा हवेतच विरली.संत कक्कय्या समाजाच्या मागणी नंतर सरकारने इत्तर समाजाला निवडणुका डो ळ्या समोर ठेऊन महामंडळ देऊ केले.
- परंतु संत कक्कय्या समाजाने पाठपुरावा करुन सुद्धा महा मंडळ दिले नाही. यासाठीचं पुन्हा एकदा संत कक्कय्या समाजाने आझाद मैदान येथे ७ जुलै २०२५ रोजी एकदि वशीय धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली असून.
- त्या निमित्ताने वीरशैव कक्कया कल्याण मंडळाचे सर्व प दाधिकारी पायाला भिंगरी लावून मुबंई सह संपूर्ण महारा ष्ट्र पिंजून ढोर समाजाला या आंदोलनात सहभागी होण्या चे अवाहन करीत आहेत आणि त्याला प्रतिसाद मोठया प्रमाणात मिळत आहे.
- ढोर (कक्कया) समाजांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत कुठल्याही सरकारकडून ढोर (कक्कया) समाजाला पुरेपूर न्याय मिळाला नाही आणि ढोर समाजाने सुद्धा कुठलेही आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी मागणी केली नाही.
- पण आजची परिस्थिती आणि उद्याची चिंता व्यक्त करता (ढोर कक्कया ) समाजाला अधिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
- कारण उद्योग व्यवसायातून आणि शिक्षणातून आर्थिक बळ नसल्यामुळे हा समाज उद्योग व्यवसायातून वंचित होत चालला आहे .
- सरकारकडून दिवसेंदिवस जातीचे आरक्षण धोक्यात येत आहे .आपल्या समाज बांधवांना रिझर्वेशनचा धोका होणा र आहे, त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या समाज मोठ्या संख्येने मागे पडताना दिसणार आहे.
- गेल्या पन्नास वर्षापासून असणारे लिड कॉम महामंडळ हे संत रोहिदास महामंडळ झाले आहे. पण त्याच्यावर कोण त्याही नेतेमंडळींनी ब्र शब्द केला नाही.
- या पन्नास वर्षात या महामंडळातून किती वाटा ढोर(कक्क या) समाजाला मिळाला याचे निदान केल्यावर असे कळा ले की फक्त दोन टक्के सुद्धा नाही.
- याचा अर्थ काय…? आम्ही अतिशय श्रीमंत आहोत… की ,आम्ही अतिशय शूद्र आहोत. आम्हाला शासकीय आम च्या हक्काचे अनुदान मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
- या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी,आज आम्हाला आम चे स्वतंत्र संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ झाले पाहिजे आणि ते आपण मिळवल्या शिवाय शांत बसायचे नाही.
- समाजात एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्यांनी आपल्या पु ढील पिढीचा विचार करता एकत्र येऊन हे आंदोलन यश स्वी करायचे आहे.
- आज जर तुम्ही मागे राहिलात तर भविष्यात ही पिढी तु म्हाला माफ करणार नाही. आंदोलनात कुणी लहान मोठा नाही तर हे आंदोलन आपल्या पुढच्या पिढीचे जीवन सुककर करण्यासाठी आहे.
- हे लग्नाचे आमंत्रण नाही की मला मिळाले नाही म्हूणन ये णार नाही तर आपल्या समाजातील मुलांचे भविष्य उज्व ल करण्यासाठी आहे याचे भान असू दया.
- एक दिवस समाजासाठी, समाजातील तरुण पिढीच्या भ विष्यासाठी ७ जुलैला सकाळी १० वाजता महाराष्ट्रातील तमाम ढोर (कक्कया ) बांधवानी एकत्र येऊन आझाद मैदानात धरणे आंदोलन करुन संत कक्कया समाजासा ठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडू.
- उठ कक्कया जागा हो, महामंडळाचा धागा हो!आता नाही तर कधीच नाही श्री.दत्ता श्रावण खंदारे धारावी ९६९९३१ ३६२१
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/