
कोकण कट्टा व देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे राजापूर खिणगिणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- कोकण कट्टा विले पार्ले व देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ विलेपार्ले यांच्या संयु क्त पणे शालेय गरजू विद्यार्थ्यांना वह्या,पेन पेन्सिल सेट,कं पास पेटी, दप्तरं व छत्री संचाचे वाटप करण्यात आले.
- ग्रामस्थ व कोकण कट्टा सदस्य सचिनभाऊ दिवाळे यांच्या पुढाकाराने आयोजन केले गेले मार्गदर्शक व माजी सभाप ती दत्ताजी कदम व कोकण कट्टा संस्थापक अजितदादा पितळे सदस्य सचिनभाऊ दिवाळे, विजय बाईत मान्यवर उपस्थित होते.
- शाळा व्यवस्थापनाचे अदध्यक्ष मनोज कदम सदस्य सचि न देव, पोलीस पाटील अशोक डोंगरकर गावापातळीचे मु ख्य मान्यवर ही आवर्जून उपस्थित राहिले होते.
- सखाराम घाडीगावकर व बापट सरांनी उपस्थित मान्यवरां चे स्वागत करुन शाळेतील मुलांचे जिल्हा पातळीवरील विविध विषय व खेळातील प्रगतीची ओळख करुन दिली.
- दत्ताजी कदमानी कोकण कट्टा संस्थेच्या 25 वर्षाच्या अ फाट कार्याची ओळख करुन दिली.
- संस्थांपक अजितदादा यांनी सचिनभाऊंचा हा शैक्षणिक सामाजकार्याचा वसा आपण ही पुढे न्यायचा आहे व तो ग्रामस्थांनी अंगीकारा असे आवाहन केले.
- सौ घाडीगावक र, खडपे, सुतार सर सारिका व जागृती डों गरकर यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे योग्य नियो जन केले मुलांनी व पालकांनी साहित्य स्वीकारल्यावर आनंद व्यक्त केला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/