
चिपळूण-कराड मार्ग अवजड वाहनांसाठी २२ जूनपर्यंत बंद.
- प्रतिनिधी : चिपळूण : :- चिपळूण-कराड महामार्गावरी ल पाटण तालुक्यातील पुलाचे दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून त्यामुळे हा मार्ग मोठ्या व अवजड वाहनांसाठी २२ जून २०२५ पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.
- चिपळूण कराड या मार्गावरून लहान व हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- मात्र, अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करु शकणार नाहीत. कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी देवरूख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करावा.
- तर पुण्याकडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांनी भोर घाट किंवा इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहनही लिगाडे यांनी केले आहे.
- या दुरुस्तीमुळे काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था बदलली असून वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशा सनाकडून करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/