नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्थानिक गुन्हे शाखेकडून मालाविषयी गुन्हयांची उकल, सोलापूर जिल्हयातील २४ घरफोडी, ०२ चोरी गुन्हे उघड, १५ लाख ५८ हजार ५९० रूपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

स्थानिक गुन्हे शाखेकडून मालाविषयी गुन्हयांची उकल, सोलापूर जिल्हयातील २४ घरफोडी, ०२ चोरी गुन्हे उघड, १५ लाख ५८ हजार ५९० रूपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : योगेश सुळे :- स्थानिक गुन्हे शाखे कडून मालाविषयी गुन्हयांची उकल, सोलापूर जिल्हयातील २४ घरफोडी, ०२ चोरी गुन्हे उघड, १५ लाख ५८ हजार ५९० रूपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत.
  • पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्या मध्ये घडणारे मालाविषयी गुन्ह्यांचा आढावा घेवून स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मालाविषयी गुन्हे उघडकीस आण णेकामी मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.
  • त्याप्रमाणे मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखाच्या तिन्ही तपास पथकानी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणनेकामी भरीव कामगिरी केली आहे.
  • त्यामध्ये २४ घरफोडी व २ चोरी असे एकूण २६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये १५,५८, ५९०/- रूपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिणे, मोबाईल, कॅमेरा व मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
  • १. श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था. गु.शा. यांच्या नेतृत्वाखाली सपोनि / धंनजय पोरे व त्यांचे पथकाने सोलापूर ग्रामीण जिल्हयात या पूर्वी झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत गोपनिय बातमीदार मार्फत माहिती प्राप्त केली.
  • सदर बातमी प्रमाणे मंगळवेढा पोलीस ठाणे गुरंन ४४८/२०२३ भादंवि क. ४५४, ४५७, ३८० या गुन्हयातील आरोपी गोपाळपुर ता. पंढरपूर येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती पथकास मिळाली होती.
  • सदर पथकाने गोपाळपुर येथे सापळा लावून त्यास ताब्यात घेतले असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.
  • परंतू त्याचेकडे पथकाने कौशल्यपूर्ण तपास करता त्याने मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, करकंब, टेंभुर्णी व माळशिरस पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी व चोरीचे एकूण १५ गुन्हे त्याचे साथीदारा समवेत केल्याची कबूली दिली.
  • त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करता सदर गुन्ह्या तील पुढीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपी याचेकडुन सोलापूर ग्रामीण जिल्हयातील उघकीस आले.
  • नमुद आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे वर यापुर्वी टेंभुर्णी, माढा पोलीस ठाणे येथे, घर फोडी सारखे गुन्हे दाखल आहेत.
  • गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, कडील सपोनि/धनंजय हे करीत असुन त्याची मा.न्यायाल याने ५ पोलीस कोठडी सुनावली होती, स्थानिक गुन्हे शाखेच्या नने केलेल्या कौशल्यपुर्ण तपासा मुळे आरोपीत याचेकडुन वर नमुद गुन्हयातील ८,७४,३००/- रु. चे २३० ग्रॅम सोन्याचे दागिने व ३५० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
  • नमुद आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे वर यापुर्वी टेंभुर्णी, माढा पोलीस ठाणे येथे दरोडा, घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहेत.
  • गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, कडील सपोनि / धनंजय पोरे हे करीत असुन त्याची मा. न्यायालयाने ५ पोलीस कोठडी सुनावली होती.
  • स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कौशल्य पुर्ण तपासामुळे आरोपीत याचेकडुन वर नमुद गुन्हयातील ८,७४,३००/- रु. किमतीचे २३० ग्रॅम सोन्याचे दागिने व ३५० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
  • २. त्याचप्रमाणे पोनि सुरेश निंबाळकर यांच्या नेतृ त्वाखाली सपोनि शशिकांत शेळके यांच्या पथकाने वेळापूर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुरनं २५६/२०२३, भा.द.वि.क. ४५७,३८० या गुन्हया च्या तपासकामी बारकाईने व फिर्यादीशी सविस्तर विचारपूस करता फिर्यादीचे घराचे बांधकाम कर ण्यासाठी पूर्वी आलेला बोरगाव, ता. माळशिरस येथील इसमावर संशय बळावला होता.
  • त्या इसमास ताब्यात घेवून कौशल्यपूर्ण तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले त्याचेकडे तपास करता गुन्ह्यात चोरी गेलेला १० तोळे २ ग्रॅम वजानाचे दागिणे व १० चांदीचे बार व मोटार साय कल असा ५,३३,१००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
  • सदरचा गुन्हा हा गुन्हा घडल्यापासून १० दिवसा च्या आत सपोनि शेळके व पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून उघडकीस आणला असून त्यामध्ये गुन्हयातील गेला मालापैकी १०० टक्के मुद्देमाल जप्त केला आहे.
  • ३. सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सुबोध जमदाडे यांच्या पथकाने पंढरपूर उपविभागा मध्ये यापूर्वी झालेल्या मालाविषयी गुन्हयांचा वि स्तृत व बारकाईने विश्लेषण केले असता उपविभा गातील बऱ्याचा गुन्ह्यामध्ये एकच गुन्हयांची कार्य पध्दती वापरून गुन्हे झाले असल्याचे दिसून आले.
  • त्याबाबत गोपनिय माहिती काढला असता पंढरपूर येथील एक इसमाने चोरीचे गुन्हे केले असल्याची खात्रीशीर माहिती पथकास मिळाली होती.
  • सदर आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पथकाने पंढर पूरमध्ये सापळा लावून त्यास ताब्यात घेतले अस ता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.
  • परंतू त्याचेकडे पथकाने कौशल्यपूर्ण तपास करता त्याने पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका व पंढरपूर ग्रामीण मधील एकूण ९ गुन्हे केल्याची कबूली दिली आहे.
  • तसेच त्यांचेकडून सदर गुन्हयातील १,९१,२९०/- किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिणे, मोबाईल व रोख रक्कम हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
  • अशा प्रकारे पोसई सुबोध जमदाडे यांच्या पथकाने ९ गुन्ह्यातील एकूण १,९१,२०९/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.
  • सन २०२३ मध्ये आज अखेर स्थानिक गुन्हे शाखेने मालाविषयीचे दरोडा १, जबरी चोरी ५, घरफोडी ७३ व चोरीचे ४४ असे एकूण ११७ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये १,०५,६८,७६९/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.
  • सदरची कामगिरी ही शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्श नाखाली सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था. गु.शा.सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सपोनि धनंजय पोरे यांच्या पथकातील सपोफी/ख्वाजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर पोहे कों/परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजय कुमार भरले, हरिदास पांढरे, पोकों/विनायक घोरपडे, सम र्थ गाजरे, दिलीप थोरात यांनी पार पाडली आहे.
  • तर सपोनि शशिकांत शेळके यांच्या पथकातील पोसई राजेश गायकवाड, सहाफी नारायण गोलेक र, मोहन मनसावाले, धनाजी गाडे, धनराज गायक वाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, यश देवकते समीर शेख यांनी पार पाडली आहे.
  • तसेच पोसई सुबोध जमदाडे, यांचे पथकातील श्रेणी पोसई बिराजी पारेकर, सहा. फो. शिवाजी घोळवे, पोह प्रकाश कारटकर, पोना रवि माने, पोकों अजय वाघमारे, सुरज रामगुडे यांनी पार पाडली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा