
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांची रुक्मिणी पांडुरंग मंदिरात मांदियाळी.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे :- यवतमाळ तालुक्यातील हा तगाव येथील श्री.क्षेत्र रुक्मिणी पांडुरंग संस्थान येथे रवि वारी, ६ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली.
- “विदर्भातील प्रति पंढरपूर” अशी ओळख असलेल्या या पवित्र स्थळी दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली.
- श्री.विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविकांनी आपल्या मुखी ‘राम कृष्ण हरी’ चा जप करत पायी चालत मंदिरात दाखल झाले.
- मनाला अवगुणाचा वास येऊ देऊ नको,फक्त संताचे बोल मनात रुजू दे विठ्ठला अशी साद विठ्ठलाच्या चरणी माथा टेकविताना भाविकांनी घातली.
- यानिमित्त सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातून दिंडी काढण्यात आली.
- देवशयनी आषाढी एकादशी निमित्त मंदिरात आषाढी उ त्सवाचे आयोजन श्री रुक्मिणी पांडुरंग संस्थानच्या वतीने करण्यात आले असून.
- वैकुंठवासी ह.भ.प.वामनराव महाराज गुघाने साईखेडकर यांच्या कृपाप्रसादाने हा सोहळा ६ जुलैपासून ११ जुलै पर्यंत पार पडणार आहे.
- या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कर ण्यात आले आहे. शुक्रवार,११ जुलै रोजी ह.भ.प.सुरेश म हाराज बाकडे (पोफळीकर) यांच्या काल्याचे कीर्तन तसेच ह.भ.प. श्रीरामजी हनुमंते (सालोड) यांच्या हस्ते काला, व ह.भ.प. रघुनाथ महाराज चिंचखेडकर यांच्या हस्ते दहीहं डी सोहळा पार पडणार आहे.
- गावातील नागरिकांच्या वतीने सहभागी होणाऱ्या सर्व भ जनी मंडळांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
- संपूर्ण परिसरातील भाविकांनी या उत्सवात सामील होऊ न अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रुक्मिणी पांडुरंग संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/