ताप,सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले; कळमनुरी तालुक्यातील चित्र, रुग्णालयांत गर्दी
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : संदीप कारके :- मागील आठवड्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात बदल झाला. परिणामी, तालुक्यात ताप, सर्दी खोकल्या चे रुग्ण वाढले आहेत.
- उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणेच खासगी रुग्णालया मध्येही रुग्णांनी उपचार घेण्याकरिता गर्दी केली आहे.
- वातावरणातील बदलांमुळे अंगदुखी, डोके दुखणे, सर्दी, खोकला, सतत शिंका येणे, घसादुखी आदी त्रास होत आहे.
- थंडीच्या दिवसांमध्ये अॅलर्जी होण्याची शक्यता असते, त्यामुळे शिंका येतात. सध्या वातावरणा तील बदलामुळे रुग्णसंख्या वाढली आहे.
- लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीही आजारी पडत आहेत. शहरातील सर्व खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यात डेंगीची लक्षणे असलेले रुग्णही आहेत.
- रुग्णांच्या रक्तामधील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट कमी होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
- उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी बाह्य रुग्ण विभागामध्ये रोज किमान ५५० रुग्णांची तपासणी करून औषध उपचार केले जात आहेत.
- धूर फवारणीची मागणी
- शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे.याकडे नगरपालिकेने लक्ष देऊन धूर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
- शिवाय नागरिकांनीही आपल्या घराभोवती पाणी साचू देऊ नये.
- डॉक्टर म्हणतात…
- आहारात डिंकाचे लाडू, तूप, बाजरी, मका, पाले भाज्या, मांसाहार तसेच हिंग, धने, जिरे, तेजपत्ता यांसारख्या मसाल्यांपासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन वाढवावे, असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.
- रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना सर्दी, खोक ला आणि तापाच्या सम स्या जाणवत आहेत. अशा परिस्थितीत योग्य आहार, विहारासह पाणी ही उकळून प्यावे असा सल्लाही डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
- दिवसभर कोमट पाणी घ्यावे याचबरोबर थंड पदार्थांचे सेवन टाळावे, असेही सांगण्यात आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space