नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महागाईने गारठवले; ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांची अवस्था चिंताजनक…….. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

महागाईने गारठवले; ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांची अवस्था चिंताजनक……..

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : नवी दिल्ली : यंदा ब्रिटनने सर्वाधिक भारतीयांना विद्यार्थी व्हीसा जारी केले आहेत. मात्र, वाढलेली महागाई आणि पाउंडचे मूल्य यासारख्या घटकांमुळे या विद्यार्थ्यांचे तेथे जगणेच अवघड झाले आहे.

विद्यार्थी आणि तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जे विद्यार्थी अलीकडेच ब्रिटनमध्ये गेले आहेत, त्यांची सर्वाधिक अडचण झाली आहे. संकट केवळ परवडणारे घर शाेधण्यापुरते मर्यादित नाही. सातत्याने वाढत्या महागाईमुळे जेवणही खिसा रिकामा करीत आहे.

४ दिवसही तेवढे पैसे पुरत नाहीत

रिया जैन हिने सात वर्षांपूर्वी ब्रिटनमध्येच पदवी घेतली हाेती. आत पुढील शिक्षणासाठी तिने पुन्हा ब्रिटनलाच निवडले आहे. ७ वर्षांपूर्वी मला २ आठवड्यात जेवणासाठी जेवढा खर्च येत हाेता, ताे आता ४ दिवसही पुरत नाही.

या देशांनाच सर्वाधिक पसंती

उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पसंती अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना सर्वाधिक पसंत असते. इटली, जर्मनी, तुर्की, युएई आणि मलेशिया या यादीत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या पसंतीमध्ये माेठ्या प्रमाणावर बदल हाेण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.   सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/ 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा