
मॉडर्न हायस्कुलमध्ये आकाशकंदील बनवणे कार्यशाळा संपन्न.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- यमुनानगर निगडी येथी ल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कुल येथे आकाश कंदील बनविणे कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

- शाळेतील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी ‘खरी कमाई’ या उपक्रमाअंतर्गत कागदी आकाश कंदील बनविले.विद्यार्थी स्वतः तयार केलेल्या आकाशकंदीलांची विक्री स्वतःच करणार आहेत.
- यातून स्वकमाईचे मूल्य विद्यार्थ्यात रुजण्यास मदत होणा र असल्याचे प्राचार्या शारदा साबळे यांनी सांगितले.
- यातून विद्यार्थ्यांना कच्चा माल खरेदी,जोडणी,ग्राहकांशी संवाद, विक्री, नफा अशा व्यावहारिक गोष्टीचा अनुभव येतो.

- आकाशकंदिल बनविण्यासाठी शिक्षिका मीना अधिकारी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी परीक्षण केले.
- स्काऊट गाईड शिक्षिका आशा कुंजीर, शिवाजी अंबिके यांनी संयोजन केले.

- उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.निवेदिता एकबोटे, शा ळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,मुख्याध्यापिका शारदा साबळे,पर्यवेक्षक विजय पा चारणे,राजीव कुटे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











