नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली मध्ये संवर्ग दोनच्या 149 शिक्षकांच्या बदल्या पूर्ण: जिल्हा परिषद यवतमाळ…….. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली मध्ये संवर्ग दोनच्या 149 शिक्षकांच्या बदल्या पूर्ण: जिल्हा परिषद यवतमाळ……..

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: सचिन ना.कोयरे : प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये संवर्ग दोनच्या १४९ शिक्षकांची सोयीच्या ठिकाणी बदली झाली. यासंदर्भातची यादी बदली पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे.                                                                                      नंतर रिक्त शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, संवर्ग तीन मधील शिक्षकांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी रविवार, दि. ८ जानेवारी रोजी पोर्टल सुरू करण्यात आले.बदली अधिकार पात्र २०९ शिक्षक आहे. दोन वर्षांनंतर पहिल्या टप्प्यात संवर्ग एक मध्ये समाविष्ट असलेल्या एक हजार १९२ शिक्षकांमधील काही शिक्षकांनी ३० शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवला होता.                                                                                   यातून ४२१ शिक्षकांच्या सोयीच्या ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. बदली बाबत पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले आहे. तर संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणासह इतर, असे मिळून १४९ शिक्षक होते.या शिक्षकांनी प्राधान्यक्रम नोंदवला होता.                 नोंदविलेल्या प्राधान्यक्रमानुसार संवर्ग दोनमधील १४९ शिक्षकांच्या सोयीच्या ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. बदली झालेल्या शिक्षकांची पोर्टलवर यादी प्रसिद्ध झाली आहे. आता संवर्ग तीन मधील शिक्षकांची बदली प्रक्रीया रविवार, दि. ८ जानेवारी रोजी पासून सुरू झाली आहे.                                                                                                         तत्पूर्वी संवर्ग एक आणि संवर्ग दोन,असे मिळून ५७० शाळांमधील रिक्त पदे भरले असून,उर्वरीत रिक्त शाळांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदा संवर्ग तीनमध्ये बदली अधिकार पात्र २०९ शिक्षक आहेत.                                                          यवतमाळ नजीकच्या शाळांनाच प्राधान्य जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक शाळा आहेत. यातील रिक्त शाळांमध्ये सर्वाधिक पसंती यवतमाळ नजीकच्या शाळांनाच आहे.                                                                                                                          संवर्ग एक आणि संवर्ग दोनमध्ये अर्ज भरणाऱ्या बहुतांश शिक्षकांनी यवतमाळसह आजुबाजुच्या तालुक्यातील शाळांना प्राधान्यक्रम दिला आहे. पहिल्या टप्प्यात बदली प्रक्रीया आटोपल्याने ह्या शिक्षकांना सोयीच्या शाळा मिळाल्या आहेत.                          सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा