नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माळशिरस तालुक्याचा आरोग्य विभागच अत्यवस्थ – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

माळशिरस तालुक्याचा आरोग्य विभागच अत्यवस्थ

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : धनंजय गोफने :- माळशिरस तालु क्यात एक उपजिल्हा रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालये, १२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ७६ उपकेंद्रे असून, प्रत्यक्षात यामध्ये एम.डी. मेडिसिन या पदाची गरज आहे.
  • एम.डी. मेडिसिन नसल्यामुळे गंभीर आजारी रुग्णा स ग्रामीण रुग्णालयात किंवा उपजिल्हा रुग्णालया त योग्य ते उपचार होत नसल्याने उपस्थित डॉक्ट रांकडून जबाबदारी न स्वीकारता त्या रुग्णास पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवि ण्याची चिठ्ठी दिली जाते.
  • नांदेड आणि संभाजीनगरच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात एम.डी. मेडिसिन पदे त्वरित भरणे गरजेचे आहे.
  • तसेच या रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ ही पदे रिक्त आहेत. अशी पदेही त्वरित भरणे गरजेचे आहे.
  • ही आहेत रिक्त पदे…
  • माळशिरस तालुक्यात मोरोची, मांडवे, फोंडशिरस, पुरंदावडे, माणकी, पिलीव, वेळापूर, बोरगाव, महा ळुंग, लवंग, माळीनगर, शंकरनगर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे असून २५ वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत.
  • प्रत्यक्षात २२ वैद्यकीय अधिकारी कामावर हजर असून तीन पदे रिक्त आहेत. तसेच समुदाय आरो ग्य अधिकारी मंजूर पदे शून्य मंजूर असून प्रत्यक्षा त ३७ पदे भरलेली आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ १२ पदे मंजूर असून,
  • सहा पदे भरलेली आहेत. कनिष्ठ सहायक १२ मंजूर आहेत आठ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय क पुरुष २७ पदे मंजूर २२ भरलेली आहेत.
  • आरोग्य सहायक स्त्री २४ पदे मंजूर, १६ पदे भरले ली आहेत. आरोग्यसेवक ८३ पदे मंजूर ५२ पदे भरलेली आहेत. आरोग्य सेविका १०० पदे मंजूर ५८ पदे भरलेली आहेत.
  • औषध निर्माता १२ पदे मंजूर आठ भरलेली आहेत. वाहन चालक १२ मंजूर आहेत व १२ पदे भरलेली आहेत. परिचर ४८ पदे मंजूर १८ भरलेली आहेत.
  • आरोग्य सेविका ४०५ पदे मंजूर ३९७ भरली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे १२ आणि उपकेंद्रे ७६ यामध्ये १४१ पदे रिक्त आहेत.
  • ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या पगारावर दर महिन्याला शासनाचे लाखो रुपये खर्च होतात.
  • परंतु महत्त्वाच्या पदांवर वैद्यकीय अधिकारी कार्य रत नसल्यामुळे अपेक्षित रुग्णसेवा घडत नाही. शासनाने एमडी पदे त्वरित भरून रुग्णांना चांगल्या प्रकारे ग्रामीण रुग्णालयाची सेवा देण्याची गरज आहे.
  • अजय सकट, माजी पंचायत समिती सदस्य
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा