
धानोरा येथे विद्युत प्रवाहाने शेतकऱ्याचा मृत्यू जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी लावलेल्या करंटने घेतला बळी.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे :-जंगली जनावरांच्या वाढत्या त्रासामुळे शेतीचे रक्षण करण्यासाठी शेतात विद्युत तारा लावण्यात आले होते.
- मात्र, त्याच तारेच्या संपर्कात आल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार अंकुश अरुण नेवारे वय ३३ राहणार धानोरा वडगाव असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते आपल्या शेतात पाहणीसाठी गेले असता, त्यांनी चुकून करंट असलेल्या तारेस स्पर्श केला.

- विद्युत प्रवाहाच्या तीव्रतेमुळे ते जागीच कोसळले. घटने नंतर ग्रामस्थांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
- घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
- या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.ग्रामीण भागात वाढत्या जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, संरक्षणासाठी असे उपाय करावे लागतात.
- मात्र,या उपाययोजना जीवघेण्या ठरत असल्याने प्रशासना ने यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











