मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई मागणीसाठी परंडा शहर आयंशी टक्के बंद; भ्रष्टाचाराविरोधी कृती समितीचे आंदोलन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- नगरपरिषदच्या मु ख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या प्रशासकीय काळाती ल कारभाराची चौकशी करून त्यांना निलंबित करण्या च्या मागणीसाठी गुरुवारी शहरात बंद पाळण्यात आला.
  • सर्व पक्षीय भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीने आयो जित या बंदला परंडा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रति साद दिला.
  • भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने तहसीलदारांमार्फत मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनात मुख्याधिका री मनीषा वडेपल्ली यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
  • त्यात प्रामुख्याने संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या पाल खी मार्गाचा रस्ता फोडून वारकऱ्यांना मुरुमावरून चाल ण्यास भाग पाडल्याचा आणि नगर परिषदेकडे शौचालयां ची मागणी करूनही ती उपलब्ध करून न दिल्याचा आरो प केला आहे.
  • शहरातील काशिमबाग येथे सार्वजनिक शौचालय बांधून ही मागील चार वर्षांपासून ते बंद असल्याचा मुद्दाही निवेद नात नमूद करण्यात आला आहे.
  • या सर्व प्रकरणांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून त त्काळ कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे. याशिवाय इतर कामांची यादी जोडली आहे.
  • माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अं बादास दानवे,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.
  • या निवेदनावर रणजीत ज्ञानेश्वर पाटील, राहुल मारुतीराव बनसोडे, ड.नुरोद्दीन चौधरी, शब्बीरखा पठाण, जमीनखा पठाण,ॲड. संदीप पाटील,इस्माईल कुरेशी, रईस मुजावर, डॉ.अब्बास मुजावर, श्रीहरी नाईकवडी, सत्तर पठाण, रमे श सिंह परदेशी,घनश्याम शिंदे, कुणाल जाधव, समीर पठा ण, नशीर शहा बर्फिवाले, खय्युम तुटके, नंदू शिंदे, तयब मुजावर,‌रईस मुजावर आदींसह भ्रष्टाचार विरोधी कृती स मितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, यावे ळी सेकडो संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
  • या बंदमुळे परंडा शहरात शांततापूर्ण वातावरणात आंदोल नाची नोंद झाली असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles