
परंडा तालुक्यातील ७२ ग्रा.पं. पैकी 37 महिला तर 35 पुरुष सरपंचपदाचे आरक्षण जाहीर.
- प्रतिनिधी : फारूख शेख :-परंडा तालुक्यातील ७२ ग्राम पंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी (दि१०) जाही र करण्यात आले आहे.
- यापैकी 37 ग्रामपंचायत या महिला प्रवर्गासाठी आरक्षीत झाल्या आहेत. परंडा तहसील कार्यालयात लाहाण मुला च्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली.
- यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी जयवंत पाटील, त हसीलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पांडुरंग मा ळेकर, विजय बाडकर आदीसह महसूल कर्मचारी उपस्थि त होते.
- परंडा तालुक्यात अनेक ग्रामपंचायतमध्ये आरक्षण सोड तीनंतर इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.
- 37 ग्रामपंचायतीत राहणार महिलाराज पद अनुसूचीत जा तीसाठी तर जवळा (नि),शेळगाव सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी सुटले आहे.
- डोंजा, सोनारी या ठिकाणी महिलाराज राहणार असून ए कमेव टाकळी ग्रामपंचायत अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत झाली आहे.
- अनुसुचित जातीसाठी तालुक्यातील देऊळगाव, भांडगाव, लोणी, वागेगव्हाण तर अनुसुचित जाती महिला प्रवर्गासा ठी कात्राबाद, कुभेजा, जाकेपिंपरी, गोसावीवाडी (डोंजा), कालों गा ग्रामपंचागत आरक्षीत झाल्या आहेत.
- नागरीकाचा मागास प्रवर्ग रोहकल, उंडेगाव, कंडारी, पिंप रखेड,काटेवाडी, येणेगाव, बावची, अनाळा, इनगोंया, शिरा ळा तर नागरीकाचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्गासाठी आ लेश्वर, खासापूरी, मलकापूर, वडनेर, बोत्री, कपिलापूरी, पि पळवाडी, चिंचपूर (ख), कुभेफळ येथील सरपंचपद आर क्षीत झाले आहे.
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी देवगाव (बु), आसु, लोहारा, खा सगाव, रजापुर, कौडगाव, चहिटना, घारगाव, जेकटेवाडी, जवळा (नि), अरणगाव, आवारपिंपरी, वाकडी, खंडेश्वरवा डी, रुई, दमपिंपरी, कोकरवाडी, नालगाव, भोत्रा, चिंचपूर (बु), शेळगाव, मुर्गाव तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी हिंगणगाव (बु), कांदलगाव, कुक्कडगाव, पाचपिंपळा, सा कत (खु), देवगाव (खु), वाटेफळ, रोसा, राजुरी, डोमगाव, साकत (बु), डॉजा, तांदुळवाडी, भोजा, सोनारी, सिरसाव, हिंगणगाव (खु), पांढरेवाडी, पारेवाडी, अंदोरा, खानपूर आरक्षीत झाले आहेत, महिलाना सरपंच पदासाठी जास्त जागा पडल्याने पुरुष नाराज दिसत होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











